पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील ताजने यांचे मार्गदर्शनात *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “माझी माती, माझा देश” आणि ” पंचप्रण शपथ ” कार्यक्रमाचे पो. ठाणे रामनगर पोलीसांतर्फे अप्रतिम आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :
भारत सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "माझी माती, माझा देश" हा कार्यक्रम देशातील प्रत्येक गावामध्ये साजरा करावयाच्या आहे.
त्यानुसार पोलीस स्टेशन रामनगर येथे दि. 13/08/2023 रोजी "माझी माती, माझा देश" हा कार्यक्रम साजरा करण्यात आला, या कार्यक्रमामध्ये स्वतंत्र दिनाच्या अनुषंगाने नागरिकांना मार्गदर्शन करून, पंचप्रण शपथ घेण्यात आली. तसेच पोलीस स्टेशन रामनगर च्या नवीन ईमारतीच्या प्रांगणात एकुण 45 वृक्ष लावुन वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला पो.स्टे.रामनगर चे ठाणेदार पो. नि. केंजळे, तसेच पो. स्टे. सहा.अधिकारी सपोनि बस्तवाडे , श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रहमतकर व पोलीस अमलदार तसेच पो.स्टे. हद्दीतील ईतर सन्मानित नागरिक उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com