अवैधरित्या चालणाऱ्या हश टॅग कॅफे ,हुक्का पार्लरवर रामनगर पोलीसांची बेधडक छापा कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:
पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री. सुनील ताजने,यांचे मार्गदर्शनात अवैधरित्या चालणाऱ्या “हश टॅग कॅफे, हुक्का पार्लरवर” रामनगर पोलीसांनी छापा कारवाई केली आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक- संदेश केंजळे यांना गोपनीय बातमीदार कडून माहिती मिळाली की, कॅफे च्या नावाखाली रेलटोली परिसरात हश टॅग कॅफे, येथे अवैधरित्या हुक्का पार्लर चालविण्यात येत असून तरुण युवकांना नशेच्या आहारी करण्यात येत आहे अश्या मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारावरून पो. स्टाफ सह, हश टॅग कॅफे, रेलटोली, गोंदिया येथील हुक्का पार्लरवर दिनांक 12/08/2023 रोजी रात्रौ 22.30 ते 23.40 वा दरम्यान छापा कारवाई करण्यात आली असता आरोपी नामे ➖
1) रिचर्ड प्रदीप फ्रान्सिस वय 28 वर्ष रा. बिरजू चौक, रामनगर, गोंदिया (विना परवाना अवैधपणे तंबाखूजण्य पदार्थाचा हुक्का पार्लर चालविणारा)

आरोपी क्र.➖
2) आदर्श अनिल विश्वकर्मा वय 22 वर्ष रा. सुबोध चौक, गणेशनगर, गोंदिया
3) फिलिप बब्बु संतियागो वय 21 वर्ष रा. पाटणकर चौक, जरीपटका, नागपूर यांना सेवणाकरिता सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने दिला. त्याप्रमाणे नमूद आरोपी यांच्या ताब्यात खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.
1) AL AYAAN ZAFFRAN PAN असे लिहिलेले बॉक्स 2 नग प्रत्येकी 120 रू. असे एकूण कि. 240 रू.
2) afzal कंपनीचा MINT फ्लेवर असे लिहिलेला बॉक्स 4 नग प्रत्येकी किं. 100 रू. असे एकूण कि. 400 रू.
3) MARHABA कंपनीचा MEHFIL (QIWAM) फ्लेवर असे लिहिलेला बॉक्स 4 नग प्रत्येकी कि. 95 रू. एकूण कि. 380 रू.
4) Aladdin कंपनीचा Brain FREEZER फ्लेवर असे लिहिलेला बॉक्स 4 नग प्रत्येकी कि. 150 रू एकूण कि. 600 रू.
5) एक काचेचा हुक्का पॉट पाईप सह कि. अंदाजे 500 रू.
6) इतर 4 काचेचा हुक्का पॉट कि. अंदाजे 500 रू.
7) 260 रू. काऊंटर मधील भारतीय चलनातील रोख रक्कम असा एकूण कि. 4,380 रू. चा माल मिळून आल्याने जप्त करण्यात आला.
नमूद तिन्ही आरोपी यांचेविरूद्ध पो. ठाणे रामनगर येथे (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य आणि वितरण नियमन) कायदा 2003 चे कलम 4 व सदर कायद्याचे संदर्भात महाराष्ट्र शासन 2018 चा अधिनियम क्रमांक 60 अन्वये कलम 4(अ), 21(अ) चे उल्लंघन केले असल्याने पो हवा. सुनील चव्हाण यांचे लेखी खबरेवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नी. राजू बस्तवाडे पो.स्टे. रामनगर करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे निर्देश, आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या नेतृत्त्वात सपोनी- राजू बस्तवाडे, पो.उप. नी. सुशील सोनवणे, पो. हवा. सुनीलसिंह चौव्हान, पोहवा जावेद पठाण,माने, पोना. दारासिंग पटेल, राहुल वणवे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com