सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित पोलीस पाटील यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा उत्साहात संपन्न.

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :
सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने सातारा जिल्हयातील सर्व पोलीस पाटील यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा दिनांक 09/08/2023 रोजी सकाळी 10/00वा ठिकाण- अलंकार हॉल सातारा येथे उत्साहात पार पडली.


सदर प्रशिक्षण व कार्यशाळाकरिता श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, प्रमुख वक्ते श्री संभाजीराव पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, श्री वसंत साबळे, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार यांनी उपस्थित पोलीस पाटील यांना पोलीस पाटीलांची कर्तव्य, जबाबदारी, पोलीस पाटील बातम्याचे स्त्रोत, पोलीस पाटील व पोलीस यांचा समन्वय विषयावर मार्गदर्शन देणेत आले.

प्रत्येक पोलीस ठाणे हददीतील सन 2022-2023 मध्ये चांगली कामगिरी केलेल्या प्रत्येकी 02 असे एकूण 60 पोलीस पाटील यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.


या कार्यशाळेस जिल्हयातून सुमारे 750 पोलीस पाटील उपस्थित होते.
सदरचे प्रशिक्षण व कार्यशाळा मा. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व मा श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री के.एन. पाटील, पोनि तथा प्रभारी पोलीस उपअधीक्षक, (गृह) सातारा यांचे उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे नियोजन सपोनि श्री संजय बोंबले सपोनि श्री अभिजीत यादव, मपोहवा श्रीमती यादव, पोकॉ श्री राक्षे पोकॉ श्री बाकले पोलीस कल्याण विभाग यांनी केले
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com