पोलीस ठाणे – रावणवाडी पोलीसांची कारवाई :- अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने बंदिस्त करून वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल, एकुण 25 गोवांशिय जनावरे, 3 वाहणे असा एकुण 16 लाख, 25 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हददीत अवैधरित्या धंदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील सर्व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे यांनी याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते.

    ▪️.  या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या आदेशान्वये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री. सुनिल ताजने, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडी पोलीसांची जनावरांची अवैधरित्या वाहतूk करणाऱ्या विरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.

       ▪️ या अनुषंगाने दिनांक 07/08/2023 रोजी चे 00.50 वा. ते 03.00 वा. रात्रो दरम्यान पोलीस स्टेशन रावणवाडी चे ठाणेदार पो. नि. श्री. पुरुषोत्तम अहेरकर, यांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे पो. स्टे. रावणवाडी येथील पोलीस पथकाने चंगेरा गावात जाणाऱ्या रोडवर तिन वाहने, जनावरें कोंबलेल्या स्थितीत दिसून आल्याने तिन्ही वाहनांचे डाल्याची पाहाणी केली असता- (1) महीन्द्रा बोलेरो पिकअप पांढरे रंगाची मालवाहक क्रं. एम.एच. 35 / ए.जे. 2134 कि. सु 6.00..000/रू. त्यामध्ये 4 गाई व 4 बैल असे एकुण 8 बोवंशीय जनावरे प्रयेकी 5.000/ रू प्रमाणे एकुण 40.000 / रू 

(2) एक झेनॉन पिकअप लालसर रंगाची मालवाहक क एम.एच.20 सी.टी. 6185 कि.सु. 4.00.000 त्यामध्ये 5
गाई व 4 बैल असे एकुण 9 गोवंशीय जनावरे प्रत्येकी 5.000/ रू प्रमाणे एकुण 45.000/-

(3) महीन्द्रा कंपनीची पिकअप पाढरे रंगाची मालवाहक क एम.एच. 35 / के 3392 कि.सु 5.00.000 / रू त्यामध्ये 4 गाई व 4 बैल असे एकुण 8 गोवंशीय जनावरे प्रयेकी 5.000/रू प्रमाणे एकुण 40.000/ रू चे असे एकुण 25 जनावरें (13 गायी, 12 बैल) अवैधरीत्या कत्तलीकरीता निर्दयतेने, चाऱ्या, पाण्या विना कोंबून बंदिस्त केलेली जनावरे, तिन्ही वाहणासहित किंमती एकूण 16 लाख 25 हजार रू. चा माल मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आला.

      ▪️मिळुन आलेली 25 गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता कोरणी येथील गौशाळेत दाखल करण्यात आलेली आहेत.

   ▪️   सदर प्रकरणी तिन्ही वाहनाचे चालक- मालक आरोपी यांचे विरुध्द पोलीस ठाणे रावनवाडी येथे अप.क्र. 217/2023 कलम 11(1),(ड) प्रा.छ. प्रति.अधि. 1960 सह कलम 5, (अ), 9 (अ), महा. पशु संवर्धन अधि. 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास व कायदेशीर कारवाई स.पो.नि.सुनील अंबुरे, पोलीस ठाणे रावणवाडी हे करीत आहेत. 

   ▪️ सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा.अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री. सुनील ताजने, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रावणवाडी चे ठाणेदार पो.नि.श्री. पुरुषोत्तम अहेरकर स.पो. नि. सुनील अंबूरे,पो.हवा. चव्हाण,बावनथडे, तुरकर, बिसेन, पो. शि. विठ्ठले , दगडे, चा.पो.शि खोब्रागडे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट