“पोलिस दादालोरा खिडकी” ‘एक हात मदतीचा ‘ योजनेअंतर्गत आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन. पोलीस ठाणे चिचगड चा स्तुत्य उपक्रम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया:

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक गोंदिया मा.श्री. निखिल पिंगळे, यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक, मा.श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली, गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रातील गोरगरीब जनतेच्या हिताकरिता गोंदिया जिल्हा पोलिस दल कटिबध्द असून पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रभावीपणे. कार्य करीत असून सदर योजना राबविण्यात येत आहे.

             या अनुषंगाने 

उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली “पोलिस दादालोरा एक खिडकी” ‘एक हात मदतीचा ‘ योजने अंतर्गत
पोलीस स्टेशन चिचगड तर्फे शासकीय आश्रम शाळा, कडीकसा येथे दि- 08/08/023 रोजी, आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येवून विद्यार्थ्यांंचा मोफत उपचार…करण्यात आला.

      सदर आश्रमशाळेत सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना (डोळ्याची साथ )  डोळे आले असल्याने  साधारणपणे 60 विद्यार्थी बाधित झाले होते,"पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आश्रमशाळे तील विद्यार्थ्यांना दवाखान्यात येण्याची व्यवस्था नसल्याने यावेळी ठाणेदार चिचगड यांनी 'ग्रामीण रुग्णालय ' चिचगड व ग्रामीण रुग्णालय ककोडी येथील डॉक्टर यांच्याशी त्वरित संपर्क करून तातडीने पोलिस स्टेशनच्या वाहनातून डॉक्टरच्या दोन चमू आश्रमशाळा कडीकसा येथे घेऊन जाऊन त्या सर्व विद्यार्थ्यांना उपचार केला. व विद्यार्थी यांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्याचा सल्ला दिला. 

        यावेळी पो. ठाणे चीचगड चे ठाणेदार शरद पाटील, डॉ. शहारे, डॉ. कुकडे तसेच वैद्यकीय स्टॉफ व ईतर पोलिस स्टॉफ हजर होते. शाळेचे प्राचार्य मेश्राम सर, व ईतर शिक्षक यांनी पोलीस विभागाचे खुप आभार मानलेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट