मा. श्री. हर्ष पोतदार (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, नक्षल विरोधी ऑपरेशन नागपुर,यांच्या विशेष उपस्थीतीत, मा. श्री. निखिल पिंगळे (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक गोंदिया, यांचे हस्ते “पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत” गरजू शेतकऱ्यांना “कृषी फवारणी पंप” वाटप कार्यक्रमाचे आयोजन -केशोरी पोलीस स्टेशन चा स्तुत्य उपक्रम…

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया:
पोलीस स्टेशन केशोरी तर्फे कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत दादालोरा खिड़की योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येवून नक्षलग्रस्त, ग्रामिण, आदिवासी भागातील लोकांचे जनहितार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उपक्रम राबविण्यात येत आहेत.


या अनुषंगाने दिनांक 07/08/2023 पोलीस स्टेशन केशोरीच्या वतीने ग्रामिण भागातील अल्प भुधारक शेतकरी बांधवांना ‘पोलीस दादालोरा खिड़की’ योजनेच्या माध्यमातून कृषी फवारणी पंप वाटप मा. श्री. हर्ष पोतदार (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, नक्षल विरोधी ऑपरेशन नागपुर,यांच्या विशेष उपस्थीतीत, मा. श्री. निखिल पिंगळे (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक गोंदिया, यांच्या हस्ते करण्यात आले.



सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, श्री. किशोर पर्वते, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री. लांडगे पोलीस उपअधिक्षक वि.कु.द. नागपुर, श्री. श्रिकांत घाटबांधे जी. प. सदस्य, श्री. घनशाम घामट पं.स. सदस्य केशोरी, श्री. प्रकाश गहाणे माजी जि.प. सदस्य, योगेश नाकाडे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना मा. श्री. निखिल पिंगळे पोलीस अधिक्षक सा. यांनी गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या 'पोलीस दादालोरा खिडकी' च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देवून गोंदिया पोलीस दल नेहमी जनसामान्यांच्या हिताचे कार्य करत राहील अशी ग्वाही दिली.
सदर कृषी फवारणी पंप कार्यक्रमाला पोलीस स्टेशन केशोरी परिसरातील शेतकरी लाभार्थी, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, एकता गृप केशोरी, आशा वर्कर, महिला बचत गट व परीसरातील नागरीक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात पोलीस विभागाला नेहमी मदत करणा-या उल्लेखनिय कार्य करणा-या श्री.प्रफुल्ल मुंगुलमार- डि.सी.सी. बैंक शाखा व्यवस्थापक केशोरी, सौ. ज्योती राय-रा दिनकरनगर प्रेरिका बचत गट, सौ.वनिता राजेन्द्र मडावी रा. बोरटोला प्रेरिका बचत गट. श्री. चुनन्नीलाल किरणापुरे- एकता गृप केशोरी, श्री भागवत पडोती रा. तिबेटटोली, चायनिज सेन्टर यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे संचालन श्री अनिल लाडे सर, प्रस्तावना ठाणेदार सोमनाथ कदम तर आभार प्रदर्शन श्री. अशोक बनकर, अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी मानले.
सदर कार्यक्रम मा. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि सोमनाथ कदम, सपोनि जोहेब शेख, पोलीस हवालदार सुशील रामटेके, दिपक खोटेले, पोना राहुल चिचमलकर, मपोहवा हरिणखेडे व इतर सर्व अंमलदार यांनी यशस्वीरित्या राबवला.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com