आपलीपदार्थ मिश्रीत खोकल्याचे औषध घेऊन जाणाऱ्या डोंगरीतील आरोपीस (एएनसी) ने ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

मुंबई : डोंगरी परिसरात खोकल्याच्या औषधाच्या ३६०० बाटल्यांसह तरूणाला अटक करण्यात आली आहे. डोंगरी परिसरात एक संशयीत अमलीपदार्थ मिश्रीत खोकल्याचे औषध घेऊन येणार असल्याची माहिती एएनसीला मिळाली होती.

कोडेन फॉस्फेट या खोकल्याच्या औषधाच्या ३६०० बाटल्यांसह २३ वर्षीय तरुणाला अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) अटक केली आहे. मोहम्मद अर्शद मोहम्मद अक्रम शेख वय २३ वर्षे असे अटक आरोपीचे नाव आहे.

डोंगरी परिसरात एक संशयीत अमलीपदार्थ मिश्रीत खोकल्याचे औषध घेऊन येणार असल्याची माहिती( एएनसी)ला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे त्यावेळी १२० औषधाच्या बाटल्या सापडल्या.

त्याने दिलेल्या माहितीवरून मेमनवाडा परिसरात छापा टाकून आणखी ३४८० औषधाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे औषध (कोरेक्स ) म्हणून प्रसिद्ध असून काही तरूण त्याचा अंमली पदार्थांसारखा वापर करतात.

या औषधाच्या सेवनामुळे अति झोप येते, भूक लागत नाही. झोपडपट्टीतील तसेच मध्यमवर्गीय तरूण मोठ्या प्रमाणात याच्या आहारी गेलेआहेत.पुढील तपास अमलीपदार्थ विरोधी कक्ष करत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट