अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या अपघातग्रस्त वाहनातून, किंमती 44, हजार 220/- रूपयांची दारू जप्त, गुन्हा नोंद पो. ठाणे आमगाव पोलीसांची कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 04/08/2023 चे 22.45 वाजता दरम्यान पोलीस निरिक्षक श्री. युवराज हांडे, यांना अपघाताची सूचना प्राप्त झाल्याने त्यांनी पो.स्टाफ सह प्राप्त माहीतीचे आधारे घटना ठिकाण अंजोरा शेतशिवार येथे भेट दिली असता त्यांना शेतात एक अपघातग्रस्त वाहन व त्यात एक ईसंम जखमी झाल्याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनात अडकुन असलेल्या स्थितीत असल्याचे आणि त्याचे ताब्यातील अपघाग्रस्त वाहन भरधाव वेगाने, हयगयीने व लापरवाहीने चालवून दुसऱ्यांचे जिवीतास धोका होईल अशा स्थितीत वाहन चालवून अपघात केल्याचे व स्वतः ला जखमी | केल्याचे दिसुन आले.

       सदर अपघातग्रस्त वाहनांतील जखमी हा वाहनाचे बाहेर निघू शकत नसल्याने त्यास पो.स्टाफ च्या मदतीने बाहेर काढून सर्वप्रथम त्याला 108 क्र. वर काल करुन अम्बुलन्स च्या मदतिने प्रथमोपचार करिता ग्रामिण रुग्णालय आमगाव येथे पाठविण्यात आले. त्याचे ताब्यातील अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता वाहनातून दारुबाबत उग्र वास येत असल्याने वाहनाची झडती घेतली असता वाहनातून खालील मुद्देमाल मिळून आले --

1) GOA WISKY असे नाव लिहीलेले 180 मिली नी भरलेले एकुण 402 नग काचेचे पव्वे प्रत्येकी किंमती 110/- रु. प्रमाणे एकून किंमती 44,220/- रुपयांचा मुद्देमाल

2) एक जुनी MARUTI SUZUKI कंपनीची Swift Dzire Vdi क्र. CG-04 | ZQ-8300 किंमती अंदा. 50,000/- रूपयाचे वाहनाने अवैधरीत्या वाहतुक करतांनी मिळुन आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस ठाणे आमगाव येथे

आरोपी नामे—

1) लिखेश्वर मन्नुलाल वर्मा वय 24 वर्ष रा. नवागाव पोस्ट तुमडीबोड ता. डोंगरगड जिल्हा – राजनांदगाव व ईतर एक यांचेविरूद्ध अपराध क्रं. 256/ 2023 कलम 279, 337 भादंवि. सहकलम 184 मो.वा.का. सहकलम 65 (अ) म.दाका. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

         सदरची कारवाई  मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगांव  श्री. किशोर पर्वते, यांचे निर्देश सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक पो.ठाणे आमगांव श्री.युवराज हांडे, पोउपनि खेडकर, पोशि साबळे, पोशि शेंडे, पोशि. रामटेके यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट