चारचाकी गाडी चोरुन बनावट आर.सी. च्या सहाय्याने गाडी विक्रीकरुन गंडा घालणा-या टोळीचा कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पर्दाफाश

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक बापू बागर सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सौ. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चारचाकी गाडी चोरून सदर गाडीचे बनावट आर. सी. च्या सहाय्याने गाडी विक्रीकरून गंडा घालणा-या टोळीचा तांत्रिक पध्दतीने तपास करुन पर्दाफाश केला आहे.
कराड शहर पोलीस ठाणेस स्वीट गाडीची चोरी करून तीचे बनावट आर. सी. बुक बनवून गाडीची विक्री केलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील आरोपी हे कोल्हापुर व कराड मधील असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे यांना त्यांचे गोपनिय बातमीदार मार्फत प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेणेकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक कोल्हापुर व दुसरे पथक कराड तालुका पोलीस ठाणेच्या हदीत रवाना झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे रात्री उशिरा आरोपीना कोल्हापुर बेलवडे हवेली ता. कराड मधुन ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी कडुन एक मारुती सुझुकीची स्वीफ्ट आणि टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा अशा एकून 20,00,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे अधिक तपास करता नमुद आरोपीवर गाडीची चोरी करून तीचे बनावट आर.सी.बुक बनवून गाडीची विक्री केलेबाबत इतर पोलीस ठाणेस देखील गुन्हे नोंद असल्याचे निष्पन झाले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा, अपर पोलीस अधीक्षक बापू बागर सो. सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सौ. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विभूते, पोलीस उप निरिक्षक आर.एल.डांगे, सफी देसाई, पोलीस नाईक संतोष पाडळे, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संपोष लोहार, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
आरोपी
1) युवराज बाळासो कांबळे वय 36 वर्षे रहाणार बेलवडे, हवेली ,ता.कराड ,जि. सातारा
2) तेजस राजाराम सपकाळ वय 33 वर्षे रहाणार बुधवार पेठ, कराड जि.सातारा
3) हर्षद कुंडलिक पवार वय 26 वर्षे रहाणार धोनवडे, ता. करवीर, जि.कोल्हापुर
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com