खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीस अवघ्या ५ तासात बोईसर पोलीस ठाणे यांचेकडून अटक

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर :-

दि. २३/०७/२०२३ रोजी फिर्यादी सौ. चंदा चरन वाघरी वय २७ वर्षे रा. जुनुनीपाडा, बेटेगाव, बोईसर पूर्व ता. जि. पालघर यांनी मौजे बोईसर लोखंडीपाडा येथे फिर्यादीची सावत्र बहिण मोहीनी मिलन पवार वय ३० वर्षे हिचे बरोबर तिचा पती मिलन दिपक पवार वय ३२ वर्षे, रा. लोखंडीपाडा, बोईसर ता. जि. पालघर याने घरगुती कारणावरून भांडण करुन तिला राहते घरामध्ये वायरने व लाकडी दांडक्याने मारहाण करून दि.२३/०७/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वाजताचे सुमारास तिचे पोटावर चाकुने वार करून तिला जीवे ठार मारून पळून गेलेबाबत फिर्याद दिलेवरून बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ा २९५/२०२३ ‘भा.द.वि.सं. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी हा फरार असल्याने श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी श्री. नित्यानंद झा, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे यांना पोलीस पथक तयार करून आरोपीचा शोध घेणेकामी सुचना दिल्या. त्याप्रमाणे सदरचे पोलीस पथक याने आरोपी हा अहमदाबाद, गुजरात राज्य येथे पळून जाण्याचे तयारीत असताना त्याचा सर्वतोपरीने व कसोशीने शोध घेऊन त्यास सापळा लाऊन अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत बोईसर रेल्वे स्टेशन परीसरात केवळ ०५ तासात अटक केले. त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. आरोपी यास मा. न्यायालयात हजर केले असता त्याची दि.२७/०७/२०२३ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोनि / उमेश पाटील, प्रभारी अधिकारी, बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नित्यानंद झा, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, श्री. उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे, सपोनि / सतिश गवई, सपोनि / भगवंत चौधरी, पोउपनि / विठ्ठल मनिकेरी, पोउपनि / शिरसाठ व बोईसर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट