माणगांव पोलिसाची उत्कृष्ट अशी कामगिरी माणगांव तालुक्यातील संबंधित फिर्यादी यांचे हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध काढून केले फिर्यादीना सुपूर्त …

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-सध्याच्या युगात मोबाईल वापरण्याची संख्या जास्त वाढली असून मोबाईल हे दैनंदिन वापरातील महत्वाचे गॅझेट आहे. त्यामुळे मोबाईल चोरीला जाणे किंवा गहाळ होणे यांचे प्रमाण देखील वाढलेले आहे. मोबाईल चोरीला जाणे हरवणे यामध्ये तक्रारदार यांचे नुकसान नसून तर मोबाईलमध्ये असलेल्या महत्वाचे डॉकमेंट्स फाईल फोटो यांची देखील नुकसानी होऊ शकते.


अशा प्रकरणात रायगड पोलीस विभागाकडून सदरचे मोबाईल संबंधिताना मिळवून देणेकरिता मा. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे तसेच मा. अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेडे यांच्या मार्गदर्शनखाली मा. उप विभागीय पोलीस अधिकारी पोदखुळे माणगांव पोलीस,यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व पोलीस तपास पथक माणगांव पोलीस ठाणे यांनी माणगांव पोलीस ठाणेतील दाखल गहाळ झालेले १३ मोबाईलचा शोध घेऊन संबंधित फिर्यादी यांना माणगांव पोलीस ठाण्यात बोलावून आज रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पोदकुळे उपविभाग माणगांव तसेच माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सदर या कामगिरीमध्ये पोलीस शिपाई सुग्रीव मुडे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्याच्या या कामात माणगांव पोलीस ठाण्यात कौतुकास अभिनंदन होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com