२१ वर्षापासुन खुनाचे गुन्हयात फरारी असलेला आरोपी जेरबंद सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- मा. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हा फरारी / पाहिजे असले आरोपी पकडणेबाबत श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक तयार करण्यात आलेले होते. मौजे कोरेगाव ता. कोरेगाव गावचे होतील लक्ष्मीनगर येथे राहते घरामध्ये दि. २२/०२/२००२ रोजी १९.३०
ते १३/०२/२००२ रोजी १७.३० वा. दरम्यान मालन वचन बुधावले वय ३५ रा. एकसळ ता. कोरेगाव जि. सातारा हि महिला मृत अवस्थेत मिळुन आलेली होती. तिचा आरोपीना किसन नामदेव जाधव रा. भूषणगड ता. खटाव याने खुन केलेबाबत चौकशीमध्ये निष्पन्न झालेने त्याचे विरुद्ध कोरेगाव पोलीस स्टेशन गुरनं ११/२००२ मादविसंक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला होता.

सदरचा आरोपी हा गुन्हा घडलेपासुन अद्यापर्यंत फरारी होता. तो आपली स्वतःची ओळख लपवुन मेंढपाळ होऊन खटाव व कोरेगाव परिसरात वाड्यावस्त्यावर वावरत होता. त्याचा बऱ्याचदा पोलीसांनाकडुन त्याचा शोध घेऊन ही तो मिळुन येत नव्हता. काल दि. २६/०७/२०२३ रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सदर आरोपी हा भूषणगड ता. खटाव येथे मेंढपाळ म्हणुन वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेने स्थानिक गुन्हे शाखेकडील नेमले पथकाने त्याचा भूषणगड ता. खटाव येथे शोध घेऊन त्यास ताब्यात घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. नमुद पथकाकाने आरोपीस ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेने त्यास पुढील कारवाई कामी कोरेगाव पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.

सदर कारवाई श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उप-निरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील व सफी सुधीर बनकर, पो.हवा. सचिन साळुंखे, सनी आवटे, पो.ना. अमित सपकाळ, पो.कॉ. धीरज महाडीक यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट