उमदी पोलीस ठाणे कडून गांजा विक्री व तस्करी करणारे ०३ इसमांवर कारवाई आंध्रप्रदेश येथून विक्री करण्यासाठी आणलेला ९७ किलो ८५५ ग्रॅम वाळलेला तयार गांजा, स्विफ्ट चारचाकी वाहनासह एकुण १६,६७,८२५/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त…

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली :
पोलीस स्टेशन उमदी पोलीस ठाणे गुरनं २४६/२३
अपराध क्र आणि कलम गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८ क २० (ब), २९ प्रमाणे
गु.घ.ता वेळ २२.०७.२०१३ रोजी ०१.१० वा
गु.दा.ता वेळ २२.०७.२०१३ रोजी
फिर्यादी नाव
प्रशांत दिलीप कोळी, पोहेकॉ / १३७३ नेम उमदी पोलीस ठाणे, सांगली
माहिती कशी प्राप्त झाली
गोपनीय बातमीदारामार्फत सपोनि संदीप शिंदे, उमदी पो. ठाणे
कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली ,मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील ,मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली १) सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे २) पोउपनि लक्ष्मण खरात ३) पोउपनि शिरीष शिंदे नामदेव काळेल, प्रशांत कोळी, आप्पासाहेब हाके, नितीन पलुसकर, महादेव महसनाळ, मनिष कुमरे, इंद्रजित गोदे, सोमनाथ पोटभरे, अमोल पाटील, सोपान भंडे, वहिदा मुजावर, समिक्षा म्हेत्रे
आरोपीचे नाव पत्ता
२) इफतेखारुल हुसेन उर्फ अरबाज बाबसाहेब शेख, वय २६, रा. राजु नगर, जुना कुपवाड रोड, सांगली.
२) प्रतिक हरिदास कांबळे, वय २६, रा. नागराळे, ता. पलुस, जि. सांगली
३) मोहसीन मेहबुब कागजी, वय २८, रा. १०० फुटी रोड, एस आर पाटील समोर, सांगली.
४) प्रकाश भाई (पूर्ण नाव माहित नाही), राजमंद्री, आंध्रप्रदेश (पाहिजे) ५) पिंटु माळी, रा. सांगली. (पाहिजे)
ताब्यात दिनांक २२.०७.२०२३ रोजी
गुन्हयातील जप्त मुद्देमाल
१) १,७३,२५०/- रु. किं. एक पिवळ्या रंगाचे पोत्यामध्ये तयार गांजा मालाचे चिकटपट्टीने पॅक केलेले चौकोणी खाकी रंगाचे एकुण ११.५५० किलो वजनाचे १० गांजाची पाकीटे.
२) २,३५,४२५ /- रु. किं. एक पांढ-या रंगाचे पोत्यामध्ये तयार गांजा मालाचे चिकटपट्टीने पॅक केलेले
चौकोणी खाकी रंगाचे एकुण १५.६१५ किलो वजनाचे ११ गांजाची पाकीटे.
३) २,५१,४००/- रु. कि. एक पांढ-या रंगाचे पोत्यामध्ये तयार गांजा मालाचे चिकटपट्टीने पॅक केलेले
चौकोणी खाकी रंगाचे एकूण १६.७६० किलो वजनाचे १० गांजाची पाकीटे..
४) २२२७७५/- रु. कि. एक पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये तयार गांजा मालाचे चिकटपट्टीने पॅक केलेले
चौकोणी खाकी रंगाचे एकुण १७.५८५ किलो वजनाचे ११ गांजाची पाकीटे. ५) ५,४३,१७५/- रु. कि. एक पांढ-या रंगाचे पोत्यामध्ये तयार गांजा मालाचे चिकटपट्टीने पॅक केलेले
चौकोणी खाकी रंगाचे एकुण १७.५८५ किलो वजनाचे ११ गांजाची पाकीटे.
६) २,००,०००/- रु. किं. एक पांढ-या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट व्हिडीआय नंबर एम एच १३
एझेड १३७९ जुवाकिं. १६,६७,८२५/- असा एकुण (एकूण सोळा लाख सदुसष्ट हजार आठशे पंचेवीस हजार रु. फक्त)
हकीकत
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्हयातील अवैध गांजा विक्रीव तस्करी करणारे इसमाचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करुन गुन्हे दाखल करणेबाबत सूचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत श्री सुनिल साळुंखे यांचे | मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, उमदी पोलीस ठाणेयांनी हद्दीतील बातमीदारांना सुचना दिल्या होत्या.
दि.२२,०७,२०२३ रोजी सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,| उमदी गावाचे हद्दीतील अमोघसिद्ध मंदीराकडे जाणारे रोडवर एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर नंबर एम एच १३ ए झेड १३७९ ही थांबलेली असुन सदर गाडीतून गांजाची विक्री करण्यासाठी वाहतुक होत असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने सपोनि संदीप शिंदे व वरील नमुद स्टाफ यांनी पंचासह सदर ठिकाणी जावून छापा टाकला असता सदर ठिकाणी बातमीतील पांढरी चारचाकी दिसून आली.
गाडीचे मागील बाजुस एक इसम डिक्कीमधुन पिवळया रंगाचे पोते खाली उतरविता दिसून आला. पोलीस व पंचाची चाहुल लागताच गाडीतील समोरील बाजुस बसलेले दोन इसमांनी गाडी भरधाव वेगाने उमदी गावाचे दिशेने पळवून घेवून गेले. सदर ठिकाणी गांजा मालासह उभा असलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव इफ्तेखारुल हुसेन उर्फ अरबाज बाबसाहेब शेख, वय २६, रा. राजु नगर, जुना कुपवाड रोड, सांगली असे सांगीतले. सदर इसमाचे कब्जातील पिवळ्या रंगाचे पोत्यामध्ये तयार गांजा मालाचे १,७३,२५०/- रु. किं एकुण ११.५५० किलो वजनाचे १० गांजाची पाकीटे मिळून आले. सदर पळुन गेलेल्या वाहनाचा मागोवा घेतला असता सदरचे वाहन चडचण मार्गे सोलापूरच्या दिशेने गेल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ वरिष्ठांचे परवानगीने सदरची गाडी सोलापूर मार्गे हायवे रोडने मंगळवेढा मार्गे सांगलीला जाण्याची शक्यता असल्याने नमुद पथकाने इचगाव टोलनाका येथे सापळा लावला
असता काही वेळाने बातमीतील नमुद पांढ-या रंगाची पांढ-या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट व्हिडीआय नंबर एम एच १३ ए झेड १३७९ ही भरधाव वेगाने टोलनाक्यावर आली असता पथकाने अतिशय शिताफीने सदर वाहनास व वाहनातील इसमांना ताब्यात घेतले. वाहनातील इसमांना त्यांची नावे गावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे प्रतिक हरिदास कांबळे, वय २६, रा. नागराळे, ता. पलूस, जि. सांगली व मोहसीन मेहबुब कागजी वय २८, रा. १०० फुटी रोड, एस आर पाटील समोर, सांगली अशी असल्याची सांगीतले. नमुद वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये मागील बाजूस डिक्कीमध्ये ८६.३०५ किलो तयार गांजा मालाची ५६ खाकी पाकीटे असा गांजा मालाचा मुद्देमाल मिळून आला आहे.

सदर इसमांना त्यांचे ताब्यातील वाळलेला तयार गांजा मालाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गांजा माल हा आंध्रप्रदेश राज्यातील राजमंद्री येथील प्रकाश भाई (पूर्ण नाव माहित नाही) याचे कडून आणला असल्याचे व सदरचा गांजा माल सांगली येथील पिंन्दु माळी यास विक्री करणार असल्याची माहिती दिली आहे.
यातील आरोपींवर उमदी पोलीस ठाणे येथे प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि लक्ष्मण खरात, उमदी पोलीस ठाणे हे करीत आहेत. मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत श्री सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली यापुढेही उमदी पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या अवैध धंदयावर कठोर व कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com