मोटार सायकल चोर अंबड पोलीसांच्या ताब्यात गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ठ कामगिरी…

उपसंपादक-रणजित मस्के
नाशिक:- मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अंकुश शिंदे साो, नाशिक शहर मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ चंद्रकांत खांडवी सो, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख सो, यांनी गुन्हे उघडकिस आणण्यासाठी अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन ने खालील गुन्हे उघडकीस आणले आहे.
अंबड पोलीस ठाणेकडील गुरनं ४३६ / २०२३ भादविक ३७९ प्रमाणे दिनांक १६/०७/२०२३ रोजी ०८:५४ वा फिर्यादी नामे नारायण माधवराव म्हस्के वय ५०, रा- घरकुल योजना अंबड नाशिक यांचे मालकिची हॉन्डा शाईन मॉडेलची दुचाकी क एम एच १५ जी जे ५२४३ क ची वाहन राहते घराचे पार्किंगमधुन सकाळी ०८:३० वा चे सुमारास चोरी गेले असल्याची तक्रार नोंदविली होती.
सदर गुन्हयाच्या तपासात अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने गोपनिय माहिती काढुन १) सनी बाबु सकट वय १९, रा- बि नं १ रूम नं २९ घरकुल योजना चुंचाळे नाशिक २) समीर कलीम शेख वय- १८, रा- पंचशील नगर, देवीच्या मंदिरामागे, शालीमार नाशिक यांना सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली २०,०००/- रू कि ची मोटार सायकल तसेच यातील दोन्ही आरोपीतांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे कलानगर परिसरातील यमाहा कंपनीची एफ झेड मॉडेलची एम एच १५ ई व्हि ९७९१ क ची मोटार सायकल चोरी केल्याचे कबुली दिली व त्याप्रमाणे दोन्ही मोटार सायकल गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीतांकडुन हस्तगत करून जप्त केल्या आहेत.
तसेच अंबड पोलीस ठाणेकडील | गुरनं ४३७ / २०२३ भादविक ३७९ प्रमाणे दिनांक १६/०७/२०२३ रोजी १०:५२ वा फिर्यादी नामे कमलसिंग मानसिंग मरकाम वय ३७ रा कारगिल चौक, अंबड, नाशिक यांचे मालकिची सुझुकि कंपनीची जिक्सर मोसाक सी जी १७ के एल ५१९५ हि दिनांक १५/०७/२०२३ रोजी रात्री ०८:०० वा ते दिनांक १६/०७/२०२३ रोजी चे पहाटे ०५:३० वा दरम्यान राहते घराचे पार्किंगमधुन चोरी गेली असल्याची तक्रार नोंदविली होती सदर गुन्हयाच्या तपासात अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने गोपनिय माहिती काढुन विकी मनि सिंग वय १९ रा. रुम नं. ७६, बिल्डींग नं. १, घरकुल चुंचाळे, नाशिक यास सापळा रचुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन वरील प्रमाणे नमुद मोसा हस्तगत केली तसेच चौकशी दरम्याने सदर आरोपीताने मुंबईनाका पोलीस स्टेशनला । गु.र.नं. ३०१ / २०२२ भा.द. वि. कलम ३७९ प्रमाणे दि. २९/१०/२०२२ रोजी दाखल असलेल्या, भद्रकाली पोलीस स्टेशनला गु.र.नं. २१२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दि. २०/०६/२०२३ रोजी दाखल असलेल्या, अंबड पोलीस स्टेशनला 1 गु.र.नं. ४०९/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दि. ०६/०७/२०२३ रोजी दाखल असलेल्या गुन्हयांतील चोरलेल्या मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने मोटार सायकल गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीताकडुन हस्तगत करून एकुण १,६५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त श्री चंद्रकांत खांडवी, परिमंडळ – ०२, सहा पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ व क्राईम पोनि अजय नजन यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोउनि नाईद शेख व पोउनि संदिप पवार व अंमलदार पोहवा ४१३ पानसरे, पोना १८४८ गायकवाड, पोना २०९८ परदेशी, पोशि २०५४ करंजे, पोशि २०८३ ढाकणे, पोशि २३५९ शिंदे, पोशि २३९१ भुरे, पोशि २५४७ शिंदे, पोशि २२२९ भोये, पोशि २६९७ राठोड, पोशि ९३० राउत, पोशि २३४६ मते, पोशि १५६६ जाधव, पोशि २०९३ पाटील यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोहवा ४१२ / झोले हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com