भिशीच्या नावाखाली जेष्ठ नागरिकाला फसवणाऱ्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

0
Spread the love

पिंपरी चिंचवड: थेरगाव, वाकड पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी ,संत तुकाराम नगर येथे भिशी चालवून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 6 जणांनी मिळून एका ज्येष्ठ नागरिकाची 12 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2013 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत थेरगाव येथे घडला.

फिर्यादी श्री. लक्ष्मण नथु रानवडे वय 66 वर्षे जेष्ठ नागरिक, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार 1) अनिल, 2) संदीप पवार, 3) अरुण गायकवाड,4) हरी गायकवाड आणि दोन महिला (सर्व रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की , सहा आरोपींनी आपसात संगणमत करून भिशी चालवली. तसेच फिर्यादी यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी वेळोवेळी पैसे घेतले. सन 2013 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत आरोपींनी फिर्यादी यांची बारा लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे असे फिर्यादीच्या तक्रारीवरून वाकड पोलीसांनी गुन्हा नोंद करुन अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट