साताऱ्यात, ८ वर्षीय मुलीवर अत्याचार व खुन केलेप्रकरणी फाशीची शिक्षा व पोक्सो कायदयाअंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व १,००,०००/- रूपयाची दंडाची शिक्षा…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- स्पेशल केस नं. ०४/२०२२ ढेबेवाडी पो. ठाणे अंतर्गत गु. र. नं. ९९ / २०२१ नुसार आरोपी संतोष चंद्र थोरात वय ४१ वर्षे रा. सुतारवाडी (रूवले) ता. पाटण जि. सातारा या आरोपीने यातील पिडीत अल्पवयीन मुलगी हि ०८ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे हे माहीत असताना सुध्दा तिस चॉकलेटचे आमिष व पोपट सोबत खेळविणेचे उद्देशाने फुस लावुन तिला आरोपी याने त्याचे घराचे पाठीमागे दुर्गम भागात पडीक ठिकाणी एैनाचे झाडाखाली नेवुन तिचेवर जबरदस्तीने बलात्कार करून, त्याने तिचा गळा दाबुन तिची हत्या केली आहे व तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने तेथेच असलेल्या ओघळीत, घाणेरीचे झुडपात ७० फुटखोल लपवुन ठेवले आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा ढेबेवाडी पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आला होता. गु.र.नं. ९९/२०२१ प्रमाणे गुन्हा नोंद झाल्यावर तपासात त्वरीत तपासी अधिकारी ढेबेवाडी पोलीस स्टेशन सहा. पोलिस निरीक्षक श्री संतोष पवार यांनी स्टाफसह रूवले गावी जावून तेथील नथूराम सुतार यांचे घरावरील सी. सी. टीव्ही फुटेज तपासुन आरोपीचे निवेदनावरून शोध कार्य होउन त्यांचे मार्फत निश्चित ठिकाण शोध पंचनाम्याने पिडीत मुलीचे प्रेत हस्तगत करून मरणोत्तर पंचनामा केला त्यामध्ये पिडीत मुलीचे हातात आरोपीचे केस आढळून आले व शवविच्छेदन अहवालानुसार तिचे अंगावरील जखमा व गळयावरील व्रण तसेच तपास कामात प्राप्त महत्वाचे पुरावे यांचा विचार होवून वैदयकीय अहवाल करून ते सर्व नमुने पिडीतेची अंगावरील रक्त व आरोपीचे कपड रक्त याचे पुरावे घेवून याकामी संबंधीत पिडीतेस आरोपी सोबत : पाहणारे साक्षीदार यांचे जबाब, वैदयकीय अधिकारी यांनी दिलेली साथ, यु डी.एन.ए. अहवाल या खटल्याचे कामी महत्त्वपूर्ण ठरले व यामध्ये फिर्यादीयामध्ये फिर्यादी पक्षातर्फे एकूण ३३ साक्षीदार तपासले तसेच बचावपक्षाने आरोपीस साक्षीदार म्हणून तपासले त्या सर्वांचा कायदयाने विचार होउन मा न्यायाधीश के. एस. होरे साहेब यांनी सहा जिल्हा सरकारी वकील अँड आर. सी. शहा यांचा युक्तीवाद ग्राहय धरून दि. १९/०७/२०२३ रोजी आरोपीस प्रथमतः दोषी असल्याचे सांगुन गंभीर गुन्हामध्ये आरोपी असल्याने शिक्षेमध्ये युक्तीवाद ग्राहय धरून सदरचा खटला हा दुर्मीळ मधील दुर्मीळ असल्याचे शाबीत झाल्याने आरोपीस भा.द.वि.स. कलम ३०२,२०१ व कलम ३७६ प्रमाणे दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावली.

तसेच पोक्सो कायदयाअंतर्गत कलम ४५ प्रमाणे दोषी धरून २० वर्षे सश्रम करावास व १,००,०००/- रूपये दंड अशी शिक्षा सुनावली दंडाची रक्कम फिडीतेचे आई व वडील यांना देण्याचा आदेश केला.
श्री. विवेक लावंड उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग तत्कालीन तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार, श्री. अभिजीत चौधरी सहा. पोलीस निरिक्षक, ढेबेवाडी पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी महिला पोलिस कॉन्स्टेबल योगिता पवार यांनी सदर खटल्याचे कामकाज पाहिले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट