पुणे शहर कोथरूड पोलीस दलातील अंमलदार श्री. प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन यांची चोरांवर धडाकेबाज कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कोथरूड:

 गरीब घरातील पोटासाठी नोकरी मिळविण्यासाठी पोलीस दलात अंमलदार म्हणून भरती झालेले.

 केवळ स्पर्धा परीक्षा पास न झाल्याने पोलीस दलातील सर्वात शेवटच्या पायरीवर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत.

पण कामाची धडाडी पहिली तर यांच्यातील देशप्रेम आणि पोलीस दलाबद्दल असणारी आत्मीयता वाखाण्यासारखी आहे.
 दिनांक १८/७/२३रोजी पहाटे २/४५ वा सुमारास कोथरूड पोलिस स्टेशन बीट मार्शल पेट्रोलिंग पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि पोलीस अमलदाई अमोल नझन यांनी ३संशयित दुचाकी चोरांना पकडले. 

जेव्हा त्यांना त्यांच्या घरझडतीसाठी नेले तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिस पथक त्यांच्यापैकी दोघांना पकडण्यात यशस्वी झाले आणि एक पळून गेला.

त्यानंतरच्या घराच्या झडतीत एक जिवंत राऊंड आणि ४ मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. तपासात दोन संशयितांची नावे समोर आली
१) इम्रान खान
२)मो. युनूस साकी
वरील संशयीत हे NIA(राष्ट्रीय तपास यंत्रणा) ला पाहिजे असून त्यांच्या अटकेवर ५ लाखांचे बक्षीस आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट