पोलीस दादालोरा खिडकी योजना, “एक हाथ मदतीचा ” अंतर्गत नक्षलग्रस्त केशोरी भागातील बेरोजगार नागरिकांसाठी “मत्स्यपालन प्रशिक्षण”. चे आयोजन पो.ठाणे केशोरीचा स्तुत्य उपक्रम…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

गोंदिया : – याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. निखिल पिंगळे, यांचे संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनात ” गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस दादालोरा खिडकी योजना ” ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने अतिदुर्गम नक्षल प्रभावित क्षेत्रातील लोकांचे जनहितार्थ जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उपक्रम राबविण्यात येत आहेत.

       त्याचाच एक भाग म्हणून " पोलीस दादालोरा खिडकी " योजने अंतर्गत केशोरी पोलीस स्टेशन व BOI (RCT) गोंदिया, ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार , यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागातील बेरोजगार युवक युवती- नागरिकांसाठी 10 दिवसाचे "मत्स्यपालन प्रशिक्षण" ग्राम दिनकरनगर येथे सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये नक्षल ग्रस्त प्रभावित क्षेत्रातील युवक- नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे.

        सदर प्रशिक्षणाचे आयोजन मा. श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री अशोक बनकर अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री विजय भिसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम, सपोनि.  जोहेब शेख, पो. हवा. सुशील रामटेके, म. पो.हवा.पुनम हरिणखेडे, मपोशि निशा बोंद्रे यांनी  केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट