कडेगाव पोलीसांनी परिसरातील विद्युत मोटरी व केबल चोरणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
कडेगाव:-दिनांक 18/7/23 कडेगाव परीसरातून विद्युत मोटरी व केबल चोरी सतत होत होती अखेर विद्युत मोटारी चोरणाऱ्या दोन आरोपींना कडेगाव पोलिसांनी गजाआड करून त्यांच्या ताब्यातून दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अनिल बाळू चव्हाण (वय 21) काशिनाथ राजू चव्हाण (वय 22) रा.कडेगाव लक्ष्मी मंदिराजवळ अशी अटक करण्यात आलेली आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की दि7व8 जुलै रोजी कडेपुर येथील जयदिप संपतराव देशमुख(54)यांच्या मालकीचे श्री समर्थ शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित कडेपुर ता. कडेगाव या कारखान्याच्या गोडावूनचे शटरचे कुलुप तोडून कारखान्यातील इलेक्ट्रिक मोटार व वायर वायरिंग वायरिंग चोरून नेली याबाबत कडेगाव पोलिस ठाण्यात 12जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता .
यानंतर गुन्हातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचा कडेगाव पोलिसानी कशोसीने प्रयत्न केला याचा तपास करत असताना दिनांक 16 /7/23 रोजी कडेगाव एसटी स्टँड समोर नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन सुरू होते सपोनी संतोष गोसावी हे वाहनांची तपासणी करत असताना टीव्हीएस कंपनीची एक्सएल 100 गाडी नंबर एम एच 10डीआर 1850 या गाडीवरून संशयितरित्या एक इलेक्ट्रिक मोटार घेऊन जात असताना त्याला संशयीताला थांबून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून अधिक कसून तपास केला असता त्याच्या ताब्यातील इलेक्ट्रिक मोटर बाबत पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील विद्युत मोटार असल्याची खात्री झाल्याने विद्युत मोटार व मोटरसायकल एम एच 10 डी आर 18 50 ही पंचा समक्ष जप्त केली.

सदर आरोपीची पोलीस कस्टडीत रिमांड मंजूर करून त्याच्याकडून पोलीस कस्टडीमध्ये सखोल तपास केले असता गुन्हातील एकूण दोन लाख पाच हजार रुपये किमतीच्या चार विद्युत मोटर व मोटार पंप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर आरोपी कडून आणखी विद्युत मोटारी व केबल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपमेय पोलीस अधिकारी पद्मा कदम ,कडेगाव पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, स पो फौजदार अधिकराव वनवे पो कॉ सतीश मुळे, शिवाजी माळी, अजित जाधव, प्रवीण पाटील, पो ना पुंडलिक कुंभार, पो शि सागर निकम, संदीप जाधव ,संकेत सावंत ,उमेश तुपे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com