सतत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या समाज कंठकांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करणेबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल…

उपसंपादक-रणजित मस्के

खडकपाडा : सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून पुराव्या निशी भ्रष्टाचार उघड करणारे, वंचित कामगारांना न्याय मिळावा, यासाठी संघर्ष करणारे क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी श्री. सतिष एस राठोड, पत्रकार यांना फोन करुन आई वडिलांविषयी अर्वाच्य भाषेचा वापर करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देऊन व फेसबूक अकाउंट वरून बदनामी करणारा इसम रविंद्र परशुराम भले यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावे व आमच्या कामगार प्रतिनिधी श्री. सतिष एस राठोड, पत्रकार यांना न्याय मिळवून द्यावे यासाठी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मा. श्री. शरद झिने साहेब, पोलीस उप निरीक्षक मा. श्री. अनिल जाधव साहेब यांच्याशी चर्चा करून तक्रार अर्ज तसेच त्याबरोबर क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com