आधारवाड शशांक बाल विहार प्राथमिक शाळेतील गुरुजी आधारवाड चॅरिटेबल ट्रस्ट मधील १२ मुलांना घेतले दत्तक…
उपसंपादक – रणजित मस्के
वसई :- कल्याण पश्चिमेला कल्याण महानगर पालिका शाळा आहे शाळेचे नाव शशांक बाल बिहार प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असे आहे. ह्या शाळेमध्ये बरीच मुले शिकत आहे सर्व वर्ग भरलेले असतात. ह्या शाळेचा शालांत निकाल चांगला लागतो. ह्या शाळेतील शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक मुलाच्या गुणवत्ते कडे लक्ष देतात. शिपाई आणि सफाई कामगार सुद्धा आपली कामे सुरेख करतात.
ह्या शाळेला शिक्षकाच्या ओळखीने पुस्तके, पेन्सिल , रबर ,वह्या देणगी रुपात मिळतात. सौ सुनीता खैरनार मॅडमने सुद्धा आपल्या ओळखीने पावसाळ्यात मुलांना रेनकोट छत्रीच वाटप केले आहे. ही शाळा माझ घर आणि ह्या शाळेतील मुलं माझी आहेत ही सदभावना मनात ठेऊन मुलांना उत्कृष्ट शिक्षण शिक्षक देतात.
असाच एक छान उपक्रम सौ. गायकवाड मॅडम, सौ. सुनीता खैरनार, महाडिक सर ह्याच शाळेतील शिक्षकांनी हाती घेतला आहे. आधारवाड चॅरिटेबल ट्रस्ट मधील अनाथ १२ मुलांचा इयत्ता १ ते १० पर्यंत शिक्षणाचा खर्च स्वखुशीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनाथ आश्रम मधील मुलाच्या चेह- यावर खुशी होती. ती १२ मुले शाळेत येऊ लागली. ह्या शिक्षकाचे अधारवाड चॅरिटेबल ट्रस्ट कडून आभार व्यक्त केले जात आहे याच्या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. अश्याच प्रकारे अनाथ साठी जर काही शिक्षक आणि सेवा संस्था पुढे आल्या तर अनाथ मुलांना सहारा मिळेल. ही मुले चांगली शिकून काहीतरी होतील, ह्या शिक्षकाचे नागरिकांनी सुद्धा आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com