” विधीसंघर्षग्रस्त बालक यांस मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीसांचे विशेष प्रयत्न”

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :- अलीकडच्या काळात शरीराविरुध्द तसेच मालाविरुध्दच्या गुन्हयामध्ये विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा सहभाग मोठया आढळून येत आहे तसेच पुणे शहरातदेखील विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे गुन्हे करण्याचे प्रमाण अधिक असल्याची बाब लक्षात घेवून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने सदर बालकास गुन्हयापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन व त्यांचे सामाजीक व शैक्षणीक पुनवर्सन करून त्यांना त्यांचे आयुष्याची उज्वल सुरुवात करता येईल व त्यांचे हातून पुन्हा गुन्हा होणार नाही समुपदेशन कार्यशाळा आयोजीत करण्याचा निर्धार करुन त्याकरीता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर यानी रेकॉर्ड असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचे तसेच गुन्हेगारी मार्गाकडे वळू पाहणा-या बालकाचे तज्ञाकडून दि.०५/०४/२०२३ रोजी तसेच दि. ०९/०५/२०२३ रोजी समुपदेशन कार्यशाळा घेवून ८३ बालकांना मार्गदर्शन केले आहे .


सदर बालकाकडून तदनंतर पुन्हा गुन्हा घडला नसल्याने सदर कार्यशाळेचे महत्व व त्याचे यश लक्षात घेवून सदर विधीसंघर्षग्रस्त बालकाचे भविष्य सुधारण्यासाठी आता त्यांना कौशल्यपूर्ण व्यावसायीक शिक्षण तसेच ज्यांचे अर्धवट शिक्षण सोडलेल्या बालकांना पुढील शिक्षण देणे, ज्यांचे नुकतेच अठरा वर्षे वव पूर्ण झाले आहे त्यांना त्यांचे कोशल्याप्रमाणे नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच मा. पोलीस आयुक्त सा पुणे शहर यांचे संकल्पनेतून विधीसंघर्षग्रस्त बालकांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी ” ऑपरेशन परिवर्तन” राबविण्यात येत असून याचाच एक प्रयत्न म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी सदर उपक्रम हाती घेतला आहे.

दिनांक १५/०७/२०२३ रोजी १९०० ते २१.०० वा. च्या दरम्यान आनंद दरबार, दत्तनगर, कात्रज, पुणे या ठिकाणी मल्टी जिनिअस प्रोफेशनल प्रा.लि. पुणे तसेच एस. एम. इंटरप्रायड़ोस कंपनी, दत्तनगर, पुणे कश्मिरचे रहिवाशी व समोपदेशकार श्री. जाहीद भट, अॅडव्होकेट रुपाली थोपटे, समाजसेवक व व्यवसायीक श्री. विक्रांत सिंग यांचे सहयोगाने विधी संघर्षग्रस्त बालके त्याचे पालक, मोठ्या गुन्हेगारांकडून गुन्हेगारी क्षेत्रात येणारी लहान मुले, मुन्हेगारांची रिल्स यांना फॉलोअर्स करणारी मुली अशी एकूण १५० बालके व त्यांची पालके यांची कार्यशाळा आयोजीत करुन सदर बालकाकरिता वेगवेगळे कोर्सेस भविष्यातील त्यांना रोजगारांची संधी, गुन्हेगारीपासून परावृत्त करणेसाठी समुपदेशन असे उपक्रम घेण्यात आले त्यातील १८ वर्षे पूर्ण असलेल्या ०३ युवकांना जागेवरच रोजगार उपलब्ध करून देता आले तसेच उपस्थीत बहुतांश बालकाना वरील संस्थेच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण प्रशिक्षण संगणक तंत्रज्ञान अर्धवट शिक्षण सुटलेल्या मुलांना पुढील शिक्षणाकरीता निःशुल्क प्रवेश प्रक्रीया सदर जागेवरच राबवण्यात आली.
सदर कार्यक्रमास मा. स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ २, पुणे शहर, श्री नारायण शिरगावकर, सहा पोलीस आयुक्त सो, स्वारगेट विभाग, पुणे शहर, विजय कुंभार साहेब यांनी उपस्थीतांना भावनीक साद घालून गुन्हेगारीचे भविष्यातील दुष्परिणाम याबाबत अवगत करुन भविष्यातील चांगल्या वाटचालीसाठी बहमूल्य मार्गदर्शन केले तसेच समुपदेशन कार यांनी त्यांचे उत्कृष्ठ शैलीमध्ये बालक व त्यांचे पालकाना मार्गदर्शन करुन प्रभावित केले त्यामुळे सदर बालके व त्यांचे पालक यांनी स्वताहून पुढाकार घेवून यापुढे त्यांचे हातून कुठलाही गुन्हा अथवा गैरकृत्य होणार नाही अशी हमी दिली.
त्यावरून सदर कार्यशाळा अन्वयास्वीरित्या पार पडली आहे सदर कार्यशाळेच्या माध्यमातून पोलीसानी नागरिकाना विधी संघर्षग्रस्त बालके यांचे संबधी काही समस्या असल्यास त्यांचेशी संपर्क करणेबाबत आव्हान केले आहे.




सदर विधीसंघर्षग्रस्त बालकासंबंधी कार्यशाळा ही मा. रितेश कुमार सो पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.संदीप कर्गीक सो सह आयुक्त, पुणे शहर मा. प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदशनाखाली मा.स्मार्तना पाटील सो, पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ ०२ पुणे शहर, मा. नारायण शिरगावकर सहा पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे मा विजय कुंभार सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पो स्टे मा विजय पुराणीक पोलीस निरीक्षक गुन्हे भारती विद्यापीठ पो स्टे मा गिरीश दिघावकर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मन्दी लिनिअस प्रोफेशनल प्रा. लि. या कंपनीचे मॅनेजीग डायरेक्टर श्री. फिरोज शेख एस. एम इंटरप्रायझेस कंपनी, दत्तनगर, पुणे चे डायरेक्टर श्री प्रशात तांबोळी, समोपदेशकार श्री. जाहीद भट अॅडव्होकेट रुपाली थोपटे, समाजसेवक व व्यवसायीक श्री. विक्रांत सिंग व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अधिकारी व अमलदार यांचे प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com