मुंबईत पत्नीवर मित्रासह सामुहिक बलात्कार-अंबोली पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

मुंबई : 26 नोव्हेंबर 2021 रोजी अंबोली पोलीस ठाणे हद्दीतील पत्नीच्या कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून पतीने आणि त्याच्या मित्राने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे . ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की ,आरोपी पतीने वाढदिवसाची पार्टीसाठी जायचे असल्याचे सांगून पत्नीला मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी पीडित महिलेला कोल्डड्रिंक प्यायला दिले. कोल्डड्रिंक पिल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर काही तासांनी शुद्धीवर आली. त्यावेळी महिलेच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त झाले होते. त्यावेळी तिच्यासोबत घडलेला प्रकार लक्षात आला. यानंतर पीडितेने आपल्या पतीला जाब विचारला. त्यावेळी त्याने या प्रकरणाची कुठेही वाच्चता केल्यास ठार मारण्याची धमक दिली.

त्यानंतर घरी आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. तसेच पीडित महिलेने तिच्या सोबत घडलेला प्रकार सर्व माहेरच्या घरच्यांना सांगितला

त्यानंतर पीडितेच्या घरच्यांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अंबोली पोलीस करत आहेत. .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

     
                  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट