साताऱ्यात उंच भरारी योजने अंतर्गत विभागातील युवकांना नवीन दिशा देण्याबाबत विशेष मार्गदर्शन…

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- सातारा जिल्हयातील अशी ठिकाणे जेथे युवकांमध्ये योग्य मार्गदर्शन, संघी व साधनांअभावी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार होतात अशा क्षेत्रातील युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील पहीला टप्पा कौशल्य विकास व नोकन्या (रोजगार) सुरु असुन त्यामध्ये सातारा जिल्हयातील १५ युवक व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून २५ या वयोगटातील युवकांना देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


सातारा जिल्हयामध्ये फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये सातारा, सातारा ग्रामिण (कोरेगाव), वाई, कराड, फलटण, पाटण या उपविभागामध्ये उपविभागीय स्तरावर गुवकांना बोलावुन त्यांना आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), मेधावी स्किल युनिव्हर्सिटी, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन तसेच माणदेशी फाऊंडेशन यांचेकडील कोर्सेसची सविस्तर माहीती देवुन व्यवसाय व रोजगार मिळणेबाबत एकुण ५४७ युवक व युवतींना मार्गदर्शन केले आहे.


आज रोजी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे यांचे माध्यमातून ६० दिवसाचे प्रशिक्षणाकरीता सातारा जिल्ह्यातील दुचाकी व चारचाकी रिपेअरिंग/मॅकेनीकल, हॉटेल मॅनेजमेंट, प्लंबर व वेल्डींग या कोर्स करीता ७९ युवकांना अहमदनगर येथे तसेच इलेक्ट्रीकल या कोर्स करीता ४८ युवकांना मोर जि.पुणे या ठिकाणी असे एकुण १२७ युवकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर यांनी मार्गदर्शन करून मा.पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांचेहस्ते हिरवा झेंडा दाखवुन सर्व युवकांना पोलीस चाहनातून अहमदनगर व मोर. जि. पुणे येथे प्रशिक्षणाकरीता रवाना केले.


उंच भरारी योजने अंतर्गत सातारा जिल्हा पोलीस च प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा यांचे संयुक्त विद्यमानाने १. दुचाकी रिपेअरिंग/मॅकेनीकल, २. हॉटेल मॅनेजमेंट व ३. असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर, भोर, अहमदनगर या ठिकाणी एकुण १६० प्रशिक्षणायना पाठविण्यात आले असुन त्यापैकी ३४ युवक व युवतींना नामांकीत कंपनीमध्ये नोकरी लागलेली आहे व १२६ युवक व युवती सध्या कोल्हापूर, छ. संभाजी नगर, मोर जि.पुणे या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. आज अखेर उंच भरारी योजनेतुन एकुण २८७ युवक व युवतींना प्रशिक्षण व नोकरी करीता पाठविण्यात आलेले आहेत. तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com