इंग्लिश स्कूल बामणोली येथील जाणाऱ्या रस्त्याची भयानक अवस्थेमुळे विद्यार्थ्यांना करावी लागत आहे कसरत…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-माणगांव तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत बामणोली अंतर्गत असणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट असल्याने शाळेय विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे कसरत.
घनश्याम मेहता यांच्या दुकानापासून ते इंग्लिश स्कूल बामणोली स्कूल पर्यंत रस्ता हा भयानक खराब झाल्याने विद्यार्थ्यांना त्याच्यातूनच वाट काढत शाळेत जावं लागत आहे.पावसाळा सुरु होऊन काही दिवस झाले तरी या रस्त्याकडे ग्रुप ग्रामपंचायतचे दुर्लक्ष शालेय विद्यार्थी ये जा करीत असताना त्यांना फार अशी कसरत करावी लागत आहे.

या रस्त्याची दुरवस्था पाहून शालेय विदयार्थ्यांच्या मनात चीड निर्माण होत आहे. त्याच प्रमाणे शालेय व्यवस्थापकांडून बामणोली ग्रामपंचायतला वारंवार सूचना देऊन सुद्धा टाळाटाळ करण्यात येत आहे असे सांगण्यात येत आहे.
माणगांव तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत बामणोली यांच्या अंतर्गत असणाऱ्या सोयी सुविधाच्या कमरतेमुळे समस्थांचे माहेरघर बनले आहे. ग्रुपग्रामपंचायत बामणोली यांना ग्रामस्थ तसेच इंग्लिश स्कूल बामणोली शाळेतून निवेदन पत्र देऊन सुद्धा कोणतेही काम पूर्ण केला नसल्याने शालेय विद्यार्थी वर्गाना त्याच्यातून मुकावं लागत आहे.

तसेच वारंवार सूचना देऊन सुद्धा टाळाटाळ करण्याचे काम करत आहेत. ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य यांनी या कामात लक्ष टाकले तर बामणोली, मागवली, कलमजे या गावातून येणाऱ्या विदयार्थ्यांची सोय उत्तम प्रकारे होईल.

घनश्याम मेहता यांच्या दुकानापासून ते निलगून गावापर्यत आलेल्या रस्त्याचा निधी नक्की गेला कुठे असा आता प्रश्न चिन्ह निर्माण होताना दिसत आहे.असे प्रत्येक नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com