कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण 45 घरफोडीकरून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग यांचेकडून जेरबंद.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सिंधुदुर्ग :- दि. 12.07.2023 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक श्री. शेळके, सहा. पोलीस उप निरीक्षक श्री. कोयंडे पोहेकॉ / 903 जामसंडेकर, पोहेकॉ / 167 केसरकर, पोकों/ 655 इंगळे असे शासकीय गाडीने कणकवली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील वय 38 वर्षे रा. घर नं. 74, घाटवाडा, पडोसे, सत्तरी नॉर्थ गोवा हा त्याच्याकडील कार नं. जीए- 05/एफ-4601ने प्रवास करताना मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी करता, त्याच्याकडून 1 गावटी कट्ठा, 3 जिवंत राऊंड, 1 काडतूस बंदूक, 27 जिवंत काडतूसे, 5 तलवारी, रोख रक्कम रु. 4,69,950/-, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, 11 विविध कंपन्यांचे मोबाईल हॅन्डसेट, 166 ग्रॅम 16 मिली वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये 9,68.490/-, 5 किलो 300 ग्रॅम चांदीच्या विटा व दागिने किंमत रुपये 3.35.844/-, पैसे मोजण्याची ईलेक्ट्रीक मशिन, सोने चांदी वितळविण्याची ईलेक्ट्रीक मशिन, 3 ड्रिल मशिन, एक दुचाकी व एक चार चाकी वाहन असा एकूण 30,48,784/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाणे गु.र.क्र.194/23 कलम 3,25. 4,25 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्यामार्फतीने सुरु आहे.

आरोपी प्रकाश पाटील हा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुध्द सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये 8 गुन्हे, कोल्हापूर जिल्हयामध्ये 9 गुन्हे, गोवा राज्यात 4, कर्नाटक राज्यात 24 असे एकूण 45 गुन्हे दाखल आहेत. तसेच तो काही गुन्हयांमध्ये पाहिजे व काही गुन्हयांमध्ये फरार आरोपी म्हणून घोषीत आहे. सदर आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून सदर आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली अग्नीशस्त्र व घातक तलवारी, कोयता, चाकू, सुरा यांचा कोणत्या कारणासाठी साठा केलेला होता याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप भोसले, सहा. पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र घाग, पोलीस उप निरीक्षक श्री. रामचंद्र शेळके, सहा. पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस अंमलदार राजेंद्र जामसंडेकर कृष्णा केसरकर, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, रुपाली खानोलकर, आशिष जामदार, चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर, रवि इंगळे यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट