बस स्थानकामधील प्रवाशांना लुटणान्या टोळीचा 06 तासात शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेनेआवळल्या मुस्क्या

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- शाहुपुरी पोलीस ठाणेस गु.र.नं. 219/2023 भा.दं.वि.सं.क. 392,323.34 प्रमाणे दि. 10/07/2023 रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील फिर्यादी सिकंदर जगन्नाथ पवार हे दि.06/07/2023 रोजी मुंबई ते इस्लामपुर असा बसने प्रवास करीत असताना संध्याकाळच्या सुमारास सदरची बस हो सातारा बस स्टैंड येथे जेवन करण्याकरीता धावली असता सदर फिर्यादी हे जेवन करण्यासाठी सातारा बस स्टैंडच्या बाहेरील बाजुस आले असता अचानक तीन अज्ञात इसमांनी फिर्यादी यांना हाताने व लाथा बुक्यानी मारहान करुन त्याच्या गळयातील सोनसाखळी. बोटातील सोन्याची अंगठी, मोबाईल व खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतले. सदर घटनेबाबत फिर्यादी यांचे तक्रारीवरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी यांनी अशा प्रकारे जबरी चोरी करणारे अज्ञात इसमांचा शोध घेणे वाचत शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री.धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा पोलीस निरीक्षक श्री. बधे यांना व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
दि. 10/07/2023 रोजी शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना गोपनिय माहिती मिळाली की सदर गुन्हयातील फिर्यादी यांना चायनिजच्या दुकानावर दोन संशयीत इसमांनी मारहान करुन त्यांच्याकडील मोबाईल, सोन्याची चैन, अंगठी व रोख रक्कम नवरस्तीने काढून घेतली आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी चायनिजच्या दुकानावर जावुन चौकशी केली असता चायनिज दुकानाचे मालक रफिक युसुफ मुलाणी यांनी सदरचा प्रकार पाहीला असुन आकाश इंगवले व ओक्स खान या दोघांनी मारहान केली असलेबाबत सांगीतले. त्यानंतर आकाश इंगवले व व ओयस खान यांच्याबाबत गोपनिय माहिती घेवुन सदरचे संशयीत इसम सातारा बस स्टैंड परिसरात फिरत असले बाबत समजल्याने सापळा रचुन दोन्ही संशयीत इसमाना ताब्या ठाणेस हजर केले. व त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी अंगठी काढून घेतल्याचे कबुल केले मुद्देमालावावत चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या सोबत त्यांचा मित्र रफिक मुलाणी हा देखील असल्याचे 1/2 ताब्यात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने मोबाईल, रोख रक्कम व चैन काढून घेतल्या आहे. अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपीस गोपनिय व तांत्रिक माहितीचे आधारे 06 तासाच्या आत जेरबंद करून त्याचेकडुन व त्याचे साथिदारांकडुन गुन्हयात वापरण्यात आलेली मोटरसायकल व सोनसाखळी, बोटातील सोन्याची अंगठी, मोबाईल व खिशातील रोख रक्कम असा एकुण
3,40,280/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय
पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, गुन्हे प्रकटीकरण
शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, स.पो.फौजदार ए.ए.बागवान, पो.हवा. सुरेश घोडके, पो.ना. निलेश काटकर, महेश
बनकर, अभय साबळे, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे व सायबर शाखेचे पोलीस अंमलदार
यांनी केली आहे.
आरोपीचे नांव
- रफिक युसुफ मुलाणी वय 31 वर्षे रा. पुष्करमंगल कार्यालय समोर भोसले चाळ सातारा 2. आकाश सुधिर इंगवले वय 21 वर्षे रा.55 मेहर देशमुख कॉलणी करने पेठ सातारा 3. ओपस आयाज खान वय 27 वर्षे रा. 1 बुधवार पेठ सातारा