औरंगाबाद येथील दामिनी पथकाला बालविवाह रोखण्यास मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

औरंगाबाद:- मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली कि, बिडकीन हददीतील फारोळा येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलींचे आज गंगापुर येथील मुलासोबत विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

याबाबत मा. पोलीस अधीक्षक यांनी तातडीने पावले उचलत दामिनी पथकांचे स.पो.नि. आरती जाधव यांना आवश्यक ते निर्देश व सुचना देवून या विवाहा बाबत अधिक माहिती घेवून खातरजमा करून पालकांचे व नातेवाईकांचे #समुपदेशन करून विवाह थांबविण्याचे निर्देश दिले.

यावरून दामिनी पथकांचे प्रमुख सपोनि आरती जाधव या पथकासह फारोळा येथे गेले असता तेथे त्यांना विवाहाची तयारी होत असतांना दिसले यावरुन त्यांनी तात्काळ मुलींच्या आई वडिलांची भेट घेतली त्यावेळी हे कुटूंब शेतकरी असुन अशिक्षित असल्याचे समजले, त्यांना विधासात घेवून अधिक चर्चा करता त्यांनी त्याच्या मुलींचे वय हे १६ वर्षे असल्याचे सांगितले तसेच मुलीचे लग्न नात्यातील मुलांशी करत असल्याचे मान्य केले आहे. त्यावर दामिनी पथकांचे सपोनि आरती जाधव व चाईल्ड लाईनचे समुपदेशक श्री गोंविद तांगडे यांनी बालविवाहामुळे गुलीच्या आयुष्याबाबत होणा-या दुष्परिणामा बाबत व कायदेशिर बाबींची संपूर्ण माहिती देवून पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले.

यामुळे आई वडिल यांचे मन व मत परिवर्तन होवून त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले आहे. याबाबत त्यांच्याकडुन चाईल्डलाईनचे समुपदेशक यांनी बंधपत्र लिहून घेवून सदर मुलीला बाल कल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येवून त्यांचे निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

मा. पोलीस अधीक्षक यांनी अशा प्रकारे होणारे बालविवाह रोखण्यात अग्रेसर व कड़क भूमिका घेवुन यापूर्वी सुध्दा अशा प्रकारे अल्पवयीन मुलींचे बालविवाह पालकांचे मनपरिवर्तन करून अत्यंत सांमजस्याने रोखले आहे. या प्रकरणी सुध्दा मुलीच्या आई- वडिल व ईतर नातेवाईक यांना कायदेशिर बाबींची माहिती देवून मुलींचे अल्पवयात लग्न करणे हा कायदेशिररित्या गुन्हा असुन असा जाणीव पुर्वक बालविवाह ठरविणा-यास किवा त्यास प्रोत्साहन तसेच सोहळा पारपाडणान्यास दोन वर्षे सक्तमजुरी व एक लक्ष रुपये दंड किंवा दोन्ही • शिक्षा ही वाल विवाह प्रतिबंध अधिनियम-२००६ नुसार होवु शकते. यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलींचा लवकर लग्न करण्याचा घाट न धरता तिला उच्चतम शिक्षण घेण्यास प्रवृत्त करावे. ज्यामुळे भविष्यात मुली स्वतःचे पायावर उभे राहुन तीचे स्वतःचे उज्वल भविष्य निर्माण करून समाजात तिची एक विशिष्ट ओळख निर्माण करू शकेल.

नमुद कारवाई मा. मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली दामिनी पथकांचे स.पो.नि. आरती जाधव, चाईल्ड लाईनचे समुपदेशक श्री गोंविद तांगडे, पोलीस अंमलदार कपिल बनकर, जयश्री महालकर यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट