गोंदिया शहरात आणि जिल्ह्यात हेल्मेट परिधान न करणाऱ्या 200 च्या वर दुचाकी वाहन चालकाविरूद्ध मोटर वाहन कायद्या नुसार कार्यवाही…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :–


याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनाक 03/07/2023 रोजी मा. जिल्हाधीकारी गोंदिया यांचे कार्यलयामध्ये रस्ता सुरक्षा समिती ची मिटींग घेण्यात आली होती. सदर मिटींग मध्ये उपस्थीत असलेले मा. पदाधीकारी व अधिकाऱ्यांनी एक मतानी वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता तसेच प्राणांतीक अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वाहन चालकांनी दुचाकी चालवतांना हेल्मेटचा वापर करावा असा एकमतांनी निर्णय घेण्यात आला होता. रस्ता सुरक्षा समितीच्या मिटींग मध्ये घेण्यात आलेल्या त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे सरांनी जिल्हा वाहतुक शाखा व जिल्ह्यातील संबंधीत ठाणेदारांना अवगत करून निर्देश सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक- 04/07/2023 ते 11/07/2023 पर्यंत संपुर्ण जिल्ह्यात व गोंदिया शहरात जिल्हा वाहतुक शाखा तर्फे नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरीकांना हेल्मेटचे महत्व पटवुन देण्यात आले. तसेच सांकेतीक स्वरूपात नागरीकांना हेल्मेट घालण्याबद्दल आग्रहीत करण्यात आले. ज्या नागरीकांनी हेल्मेट घातले त्यांना थांबवून गुलाबाचे पुष्प देवुन स्वागत करण्यात आले. व दिनांक-12/07/2023 पासुन हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध मोटर वाहन कायद्या नुसार कारवाई करण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आलेले होते.
या अनुषंगाने दिनांक- 12/07/2023 रोजी पोलीस अधिक्षक, गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक श्री. अशोक बनकर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहरामध्ये दुचाकी चालवितांना हेल्मेट परिधान न करनाऱ्या एकुण 106 दुचाकी चालकांविरुद्ध तसेच दिनांक- 13/07/ 2023 रोजी एकुण 100 वाहन चालकांविरूद्ध हेल्मेट परिधान न केल्यामुळे मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतुक पोलीसांचा नागरीकांना मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करणे हा उद्देश नसुन नागरीकांच्या प्राणांची सुरक्षीतता रहावी, अपघाताचे प्रमाण कमी रहावे,आणि अपघातामध्ये डोक्याला दुखापत होवू नये नागरीकांच्या सुरक्षे करीता वाहतुक पोलीस सदरचे अभियान राबवित आहेत. नागरीकांनी कृपया दुचाकी चालवितांना उच्च दर्जाचा ( ISI MARK) चा हेल्मेट परिधान करून वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे.
नागरीकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की पोलीसांच्या भिती करीता हेल्मेट परिधान न करता, स्वतःच्या सुरक्षेकरीता स्वताःच्या जिवाचे रक्षण करण्याकरीता आणि अपघातामध्ये कमी दुखापत होणेकरीता कृपया त्यांनी उच्च दर्जाचे (ISI MARK) चा हेल्मेट परिधान करून हेल्मेट परिधान केल्यानंतर त्याची व्यवस्थीत क्लीप करून घ्यावी.असे जिल्हा पोलीस दलातर्फे आणि वाहतूक पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
विशेष मोहीमेची कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया श्री.निखील पिंगळे मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक बनकर,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जयेश भांडारकर यांच्या नेतृत्त्वात व मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com