मोक्का कायद्याअंतर्गत चार गुन्हयातील पाहिजे असलेला इराणी आरोपी, जबरी चोरी (चेन स्नॅचींग), मोटारसायकल चोरी तसेच खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास धारवाड, कर्नाटक येथुन केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

ठाणे :- ठाणे शहर, मुंबई शहर, नवी मुंबई तसेच परीसरात चेन स्नॅचींग, जबरी चोरी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडत असतांना सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरीष्ठांकडुन आदेशीत करण्यात आले होते. खडकपाडा पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्र. ३५९/२०२२ भादंविस कलम ३०७, १४१, १४३, १४७, १४८, १४९ सह म.पो. का. कलम ३७ (१), १३५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे या गुन्हयातील पाहीजे आरोपी कासीम मुख्तार ईराणी उर्फ तल्लफ वय २४ वर्षे, रा. बेडा, स्टार बेकरीमागे, पाटीलनगर, आंबिवली, मोहने, कल्याण प., ठाणे याने परिसरात चेन स्नॅचींग, जबरी चोरी तसेच वाहन चोरीचे गुन्हे करुन धुमाकुळ घातला होता. सदर आरोपी हा नेहमी जागा बदलुन राहत असल्याने त्याचे ठावठिकाण्याबाबत निश्चीत माहिती मिळत नव्हती. सदर आरोपीस पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.

खडकपाडा पोलीस ठाण्यास सदर आरोपी हा धारवाड, कर्नाटक येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळताच मा. वरिष्ठांचे परवानगीने खडकपाडा पोलीस ठाण्याचे पथक धारवाड, कर्नाटक येथे रवाना करण्यात आले होते. इंदिरानगर, आझाद रोड, अलनवर, जि. धारवाड, कर्नाटक येथे एका घरामध्ये आरोपी कासीम मुख्तार ईराणी हा असल्याचे समजताच दिनांक ०७/०७/२०२३ रोजी पहाटे ४ वाजताचे सुमारास सपोनि अनिल गायकवाड व पथक यांनी आरोपी असलेल्या घराचे भोवती स्थानिक पोलीसांचे मदतीने सापळा लावला असता आरोपीने घराचे कौले उचकटुन, शेजारील इमारतीचे गच्चीवरुन उडया मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पथकाने आरोपीचा पाठलाग करुन शिताफिने त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी झालेल्या धावपळीत तीन पोलीस अंमलदार किरकोळ जखमी झाले. सदर आरोपीस खडकपाडा पोलीस ठाणे गु.र.क्र. १७/२०२१ भादंवि कलम ३९२, ३४ मध्ये अटक करण्यात आलेली असुन त्यास दिनांक ११/०७/२०२३ पोवेतो पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.

अटक करण्यात आलेला इसम :-

  • कासीम मुख्तार ईराणी उर्फ तल्लफ वय २४ वर्षे, रा. बेडा, स्टार बेकरीमागे, पाटीलनगर,

आंबिवली, मोहने, कल्याण प., ठाणे सदर आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता सदर आरोपीने चोरी केलेल्या ५ मोटारसाकल तसेच एक अग्निशस्त्र हस्तगत करण्यात खडकपाडा पोलीस ठाण्यास यश मिळाले आहे. आरोपी कासीम मुख्तार ईराणी उर्फ तल्लफ हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

तसेच सदर आरोपी मोक्का कायद्याअंतर्गत चार गुन्हयातील पाहिजे आरोपी असुन इतर २५ ते ३० गुन्हयांमध्ये तो पाहिजे आरोपी आहे.

सदरची कौतुकास्पद कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त सो, ठाणे शहर, मा. सह पोलीस आयुक्त सो, ठाणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण प. श्री दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ-३, कल्याण, श्री सचिन गुंजाळ व मा. सहा. पोलीस आयुक्त सो, कल्याण विभाग श्री कल्याणजी घेटे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. नंदकुमार कैचे, तपास पथकाचे अधिकारी सपोनि अनिल गायकवाड, व तपास पथकाचे अंमलदार सहा. पो.उप निरी. मधुकर दाभाडे, अशोक पवार, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, पोहवा / १५४६ नवनाथ डोंगरे, पोहवा / ४०५३ जितेंद्र सरदार, पोहवा / ४४१ संजय चव्हाण, पोहवा / ३५३३ राजु लोखंडे, पोहवा / ५१८१ संदिप भोईर, पोहवा / ४१३ योगेश बुधकर, पोहवा / ३४४१ सुधीर पाटील, पोशि/ ७६५३ राहुल शिंदे, पोशि/ ६८९७ नवनाथ बोडके, पोशि/ ८३८१ अनंत देसले, पोशि/ ६५०५ कुंदन भांगरे, पोशि/ ८१६३ अविनाश पाटील यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *