सातारा येथील वाई पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणारा आरोपी व विधीसंघर्ष बालकाकडुन १० मोटार सायकल केल्या हस्तगत…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- वाई शहरात होणारे मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणने बाबत श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सुचना दिलेल्या होत्या त्यानूसार श्री. कमलेश मीना, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक, वाई पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांना मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाकडे विशेष लक्ष देवून आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.
श्री. कमलेश मीना, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक, वाई पोलीस ठाणे यांना त्याच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाई शहरातील मोटार सायकल चोरुन नेणारे अल्पवयीन मुले आहेत. सदर बातमीच्या अनुशंगाने तपास करून सदर मुलांचा शोध घेणे बाबत त्यांनी गुन्हे प्रकटीकरणविभागाचे कर्मचा-यांना सुचना दिल्या होत्या. त्यानूसार सदर मुलांचा शोध घेवून गुन्हेप्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यामुलांनी त्याचा तिसरा साथीदार आरोपी यांनी मिळून फेब्रुवारी २०२३ पासून वाई शहरातून व आजूबाजूच्या परीसरातून १० मोटार सायकल चोरल्या असून त्या सोमेश्वर, बारामती परिसरात विकल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर आरोपींनी विकलेल्या ४ हिरो स्प्लेन्डर प्रो. २ हिरो स्प्लेन्डर प्लस, १ हिरो स्प्लेन्डर, १ हिरो एच.एफ. डिलक्स, १ हिरो शाईन, १ यामाहा आरएक्स १०० अशा एकूण सुमारे २,५०,०००/- रुपये किंमतीच्या १० मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या कडून वाई पोलीस स्टेशनला दाखल असलेले ५ गुन्हे उघडकीस आलेले असून इतर मोटार सायकलचे मालकांचा शोध घेवून पुढील कारवाई करण्याच काम चालू आहे.

सदरची कारवाई श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती बाळासाहेब भालचिम, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कमलेश मीना, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक, वाई पोलीस ठाणे, श्री. आशिष कांबळे, सहराय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सुधीर वाळुंज, पोलीस उप निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी विजय शिर्के, राहुल भोईर, श्रावण राठोड, प्रेमजीत शिर्के यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जानवे खराडे, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com