मायणी ता. खटाव येथे अभयारण्यासमोर गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या इसमास ताब्यात घेवून त्याचेकडून २,५५,६००/- रुपये किंमतीचा १०.२२४ किलो ग्रॅम गांजा जप्त.

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग, कैम्प बडुज यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणारे इसमाचे विरुध्द कारवाया करण्याच्या सुचना परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक श्री. अजय कोकाटे, पडुज पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सातारा जिल्हयातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
दि.०६/०७/२०१३ रोजी परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक श्री अजय कोकाटे यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, एक इसम मायणी ता. खटाव जि.सातारा येथील अभयारण्य समोर अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील स्थानिक गुन्हे शाखा सातारा, बहुज पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व अंमलदार यांना नमुद इसमास ताब्यात घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी सापळा लावून प्राप्त माहितीमधील इसमास ताब्यात घेतले. त्या इसमाच्या कब्जात एकूण २ लाख ५५ हजार ६०० रुपये किमतीचा १० किलो २२४ ग्रॅम गांजा मिळून आल्याने त्यांचेविरुध्द बदुज पोलीस ठाणे गु.र.नं. ३४२ / २०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०(ब) (II) (च) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक श्री. अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, अमोल माने, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, मोहन नाचण, संजय शिर्के, विजय कांबळे, अमित सपकाळ, गणेश कापरे, प्रविण पवार, अनिल खटावकर, राजीव कुंभार, रुद्रायण राऊत तसेच बहुज पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार सत्यवान खाडे, शिकलगार, दन्याचा नरळे, दत्तात्रय काळे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, कॅम्प बडुज यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com