माणगांव बस स्थानकासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक सही संतापाची कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी घेतला सहभाग……

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड

माणगांव :महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर राजकारणाच्या महानाट्याला सुरुवात झाली इतिहासात नोंद होईल असे जबरदस्त धक्के या राजकारणात दिसून आले आहेत. मी या पक्षात कधीच जाणार नाही मी यांच्यासोबत कधीच सत्ता स्थापन करणार नाही असे बोलणारे आज तेच आजच्या राजकीय पक्षात सामील झाले आहेत. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर तर नाट्य सत्तातर पुन्हा सुरु झाले आहे. आता मतदाना समोर निवडणुकीबाबत अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. कोणाला मतदान करावे या सभ्रभात मतदार सध्याच्या वस्तुस्थिती दिसताना आढलत आहेत.

या सर्व पाश्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, माणगांव तालुका अध्यक्ष व मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रतीक रहाटे, माणगांव तालुका संपर्क प्रमुख चिमण सुगदरे यांच्या नेतृत्वाखाली माणगांव शहरात दि.८ जुलै रोजी “एक सही संतापाची “ही मोहीम माणगांव बस स्थानकसमोर राबविण्यात आली या राजकीय घडामोडीत आपला संताप प्रत्येक मतधारांनी एका स्वाक्षरीतुन व्यक्त करावा असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या तर्फे करण्यात आले यावेळी शेकडो मतधारांनी आपला संताप एका स्वाक्षरीतुन व्यक्त केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट