मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात ४ वाहनांचा भयंकर अपघातात एकाचा जागीच मृत्यू…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:- कशेडी घाटामध्ये अपघाताचे सातत्य कायम असून कशेडी घाटात ४ वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. कशेडी टॅप पासून दोन किलोमीटर अंतरावर बारामती पुणे ते दापोली जाणारी हुंदाई आय ट्वेंटी गाडीला मागून जाणारे टँकरने ठोकर दिल्याने सदर गाडी रस्त्याचे डाव्या बाजूस नाल्यामध्ये गेली तसेच बारामती पुणे ते दापोली जाणारी क्रेटा कार गाडीने टँकरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा अशोक लेलँड ट्रक गाडीला समोरासमोर ठोकर दिल्याने अपघात घडलेला आहे.



अपघातामधील दोन्ही कार गाड्यांच्या एअर बॅग ओपन झालेले आहेत. तसेच अपघातामध्ये हुंदाई i20 गाडी मधील मागे बसलेला प्रवासी दत्तात्रय शरद टेके याना ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना ते मयत झाल्याचे घोषित केलेले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com



