भागाड एम आय डी सीतील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते देत आहेत अपघाताला आमंत्रण…

भविष्यात होणाऱ्या अपघाताला कारणीभूत कोण ?
प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-माणगांव तालुक्यातील विळे भागाड एम आय डी सी मधून जाणाऱ्या माणगांव पुणे तसेच मुंबई पाली मार्गे विळे भागाड माणगांव हा मुख्य रस्ता आहे तसेच एम आय डी सीतुन गांव खेड्यात जाणाऱ्या रस्त्याची दुरर्वस्था दैनंदिन बिघडत जात आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुक चालकाला कमरडे मोडावं लागत आहे. भागाड एम आय डी सी रस्त्यात खड्डे भले मोठे पडल्याने दुचाकीस्वार, चारचाकी वाहन यांना कसरत करत जावं लागत आहे.तासगांव नाका ते टी पॉईंट या रस्त्याची पाहणी केली तर रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हेच समजायला मागत नाही त्यामुळे भर पावसात वाहतूक करणाऱ्या वाहनांना फार मोठया खडयातून वाट काढत मार्ग शोधावं लागत आहे.त्याच्यात एम आय डी सी मध्ये येणारे अवजड वाहनामुळे छोटया वाहनाना एम आय डी सीतील रस्ते धोक्याचे ईशारे देत आहे.


भागाड एम आय डी मध्ये अंतर्गत रस्त्यावर असणारे विद्युत पोल हे नावापुरता बसवलेले आहे रात्रीच्या अंधारातून एकादा मोटारसायकलस्वार जर कां आपलं काम संपवून घरी परतत असेल तर त्याला वाट काढत रस्त्यात भले मोठे पडलेल्या खडयातुन जावं लागत आहे त्याच्यात समोरून येणाऱ्या एखाद्या वाहनामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.यांच प्रमाणे रस्त्यावर लाईट नसल्याच गैरफायदा घेत गांव खेड्यात व एम आय डी सी मध्ये चोरी होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे एम आय डी सी मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बॅरेगडवर झाडी झूडपे जास्त वाढल्यामुळे मधल्या डीवायडवरून क्रॉस होणाऱ्या वाहनांना जीवावर आपल वाहन क्रॉस करावे लागत आहे.साईड ने कोणती वाहन जात येत असेल ते दिसण्यात अडचण निर्माण होत आहे,मे महिन्यात रस्त्यात पडलेल्या खड्याचे काम पक्के नं करता लोकांची समज म्हणून भुरूम माती टाकून खड्डे बुजविण्याचे काम तात्पुरता केले होते परंतु पहिल्या पावसाच्या आगमनाने त्याठिकाणी टाकलेली माती भुरूम वाहून गेल्याने त्या ठिकाणी मोठ मोठ खड्डे पडले आहेत तसेच या पावसामुळे खड्यात पाणी साचल्याने खड्याचा अंदाज मिळत नसल्याने स्थानिक रहिवाशी त्यांचप्रमाणे पुणे, माणगांव साईडने येणाऱ्या जाणाऱ्या दु चाकी, चारचाकी व मोठया अवजड वाहनांना भागाड एम आय डी सी अपघाताला मोठे आमंत्रण देत आहे. भविष्यात होणाऱ्या अपघाताला सर्वस्वी जबाबदार कोण ? असे प्रश्न निर्माण होत आहेत.




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com