जबरी चोरी – करणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक, दोन गुन्हे उघड किंमती 39,000/- रुपयांचा मुद्देमाल- मोपेड गाडी, पिवळ्या धातूची चैन हस्तगत, पो. ठाणे रामनगर पथकाची कामगिरी…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक 09/05/2023 रोजी चे 05.45 वाजता चे सुमारास पोलीस ठाणे रामनगर,हद्दीतील गजानन कॉलनी, गोंदिया येथील रहिवासी फिर्यादी श्रीमती – मंगला पारधी, हया सकाळी मॉर्निंग वॉक करीता जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी मोपेड गाडीने येवून फिर्यादीस थांबवून निमगाव कोठे आहे असे विचारून मोपेड गाडीवर मागे बसलेला इसमाने खाली उतरून फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरिने हिसकावून चोरी करुन नेल्याने तक्रारीवरून पो. ठाणे रामनगर येथे अप. क्रं. 121/2023 कलम 392, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .

पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्री सुनील ताजने यांनी नमुद जबरी चोरी गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने सर्व ठाणेदार- गोंदिया जिल्हा, ठाणेदार रामनगर , पो.नि. स्थागुशा यांना जबरी चोरी करणाऱ्या अनोळखी गुन्हेगारांचा शोध घेऊन तात्काळ गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचना प्रमाणे पो. ठाणे रामनगर चे पो. नि. श्री. संदेश केंजळे यांनी सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने डी.बी. पथकास आरोपींचे शोधाकरिता भंडारा, नागपूर, बालाघाट येथे रवाना करण्यात आले होते. गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की, भंडारा पोलीस ठाणे येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले आरोपी यांनी रामनगर गोंदिया परिसरात जबरी चोरी केली असून सध्या ते भंडारा कारागृहात आहेत. अश्या प्राप्त खबरे वरून आरोपी नामे -
1) अतुल राजू घुमोडे वय 32 वर्षे राहणार – लाल दरवाजा तांदापेठ नागपूर ,
2) पप्पू शामलाल बोराडे वय 23 वर्षे राहणार रिलायन्स पेट्रोल पंपच्या मागे नागपूर
यांचा प्रोडक्शन वॉरंटवर ताबा घेवून पो. ठाणे रामनगरचे वरील नमूद गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली. पो. कोठडी दरम्यान त्यांचेकडे रामनगर दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यासंबंधाने कसून चौकशी करून तपास केला असता नमूद दोन्ही आरोपितांनी रेल्वे स्टेशन येथून एका काळया रंगाची मोपेड ॲक्टिवा थ्री जी गाडी चोरून नेवून गजानन कॉलोनी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने चोरी केल्याचे कबूल केले. नंतर मोपेड गाडी ही गोंदिया कोहमारा रोडवर गाडीचे पेट्रोल संपल्याने रोडा लगत सोडून परत रिक्षाने रेल्वे स्टेशन गोंदिया येथे येऊन नागपूर करिता गेल्याची कबुली दिली.
आरोपी नामे -- 1) पप्पू शामलाल बुराडे याच्याकडून अर्धवट तुटलेली सोन्याची चैन किंमती अंदाजे 21 हजार रूपये आणि गुन्हा करते वेळी घातलेला काळया रंगाचा शर्ट गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे. पो. स्टे. रामनगर दाखल अप. क्र. 121/2023 कलम 392, 34 भादंवि आणि अप. क्रं. 122/2023 कलम 379 भादंवि असे दोन्ही गून्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनात डी.बी. पथकातील स.पो.नि. बस्तवाडे, पोहवा. राजेश भुरे, सुनील चव्हाण, छत्रपाल फुलबंधे, आशिष अग्निहोत्री,पोना.बाळकृष्ण राउत, पोशि. कपिल नागपुरे यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com



