गांजाची रोपे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व उमदी पोलीस ठाणे यांची संयुक्त कामगिरीने जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये ३ इसमांकडुन केले जप्त…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली – उमदी

अपराध क्र आणि कलम

फिर्यादी नाव

गुन्हा रजि.नंबर २२२/२०२३, कलम गुंगीकारक औषधीद्रव्य आणि

संजय वसंत पांढरे, पोकों / २२९४ नेम उमदी पोलीस ठाणे मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८ क २० (ब),

२२. २९ प्रमाणे गु.दा.ता वेळ

०५/०७/२०२३ रोजी

माहिती कशी प्राप्त झाली गोपनीय बातमीदारामार्फत

२२.५३ वाजता

नागेश खरात, पोहेकॉ / १३७०

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली
यांचे मार्गदर्शनाखाली

१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे २) संदीप शिंदे ( उमदी पोलीस ठाणे ) नागेश खरात उमदी पोलीस ठाणे कडील आप्पासाहेब हाक्के, नितीन पलूसकर, रामराम बनेनवार, संजय पांढरे,प्रशांत माळी, नामदेव काळेल आरोपीचे नाव पत्ता

१) राजेंद्र शिवाण्णा बिरादार, रा. बिरादार वस्ती संख, ता. जत, जि. सांगली.
२) श्रीकांत शिवाण्णा बिरादार, रा. बिरादार वस्ती संख, ता. जत, जि. सांगली.
३) शटगोंडा शिवाण्णा बिरादार, रा. बिरादार वस्ती संख, ता. जत, जि. सांगली.

ताब्यात दिनांक ०५/०७/२०२३ रोजी गुन्हयातील जप्त मुद्देमाल

संख गावची जमीन गट नं. २१० मधील १ एकर उसाच्या क्षेत्रात मिळून आले

१) १,२०,०००/- रु. किंमतीचा हिरव्या रंगाचा ओलसर पानांची उग्र वासाची लहान मोठे ७ ते ८ फुट उंचीची गांजची झाडे त्यांचे वजन २४.०९ किलो प्रती किलो ५०००/- रु दराने १,२०,०००/- हजार रुपयांचा मुद्देमाल

हकीकत

सांगली जिल्हयातील गांजा विक्री करणारे इसमांचा मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली. यांनी आढावा बैठकीमध्ये शोध घेऊन त्यांचेवर गुन्हे दाखल करुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, यांना सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था.गु.अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करुन त्यांना गांजा विक्री करणारे इसमांची शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदशित केले होते.

नमुद पथकाने सांगली जिल्हयातील गांजा विक्री करणारे इसमांवरती लक्ष केंद्रीत करुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता पोहेकॉ/नागेश खरात यांना माहिती मिळाली की, उमदी पोलीस ठाणे | हदीमध्ये संख गावातील राजेंद्र शिवाण्णा बिरादार यांचे शेत जमीन गट नं. २१० मधील १ एकर जमीनीतील उसाचे पुर्व पश्चिम चालीचे सन्ऱ्यामधील पिकाचे शेतात गांजाचे झाडाची लागवड केलेली आहे. त्याप्रमाणे पोहेकॉ / नागेश खरात यांनी सदरची माहिती ही पोनि / सतिश शिंदे यांना कळवली. त्यानंतर पोनि / सतिश शिंदे यांनी, उमदी पोलीस ठाणे प्रभारी सपोनि / संदीप शिंदे यांना हि माहिती देऊन पोहेकॉ नागेश खरात यांचेसह त्यांचेकडील त्यांचा स्टाफ आप्पासाहेब हाक्के, नितीन पलुसकर, रामराम बनेनवार, संजय पांढरे, प्रशांत माळी, नामदेव काळेल व सोबत पंच असे मिळालेल्या बातमी प्रमाणे राजेंद्र शिवाण्णा बिरादार यांच्या शेतात जावून खात्री केली असता वरील आरोपीत यानी संगणमत करून गांज्याच्या झाडाची लावन करुन त्यांची जोपासना केलेले हिरव्या रंगाचा ओलसर पानांची उग्र वासाची लहान मोठे ७ ते ८ फुट उंचीची गांजाची झाडे मिळून आली. त्याप्रमाणे सदरची सर्व झाडे ही जप्त करुन त्यांचे वजन केले असता त्यांचे एकूण वजन २४.०९ किलो असे असून त्यांची किंमत १,२०,०००/- रुपये इतकी असल्याने सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन

आरोपीत १) राजेंद्र शिवाण्णा बिरादार, रा. बिरादार वरती संख ता. जत, जि. सांगली
२) श्रीकांत शिवाण्णा बिरादार, रा. बिरादार वस्ती संख, ता. जत, जि. सांगली
३) शटगोंडा शिवाण्णा बिरादार, रा. बिरादार वस्ती संख, ता. जत, जि. सांगली त्यांचेवर उमदी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट