मुंजवडी ता. फलटण जि.सातारा येथे मांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या इसमाना ताब्यात घेवून त्यांचेकडून ५ लाख रुपये किमतीचा २० किलो गांजा व १ लाख रुपये किमतीच्या मोटार सायकल असा एकूण ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणारे इसमांचे विरुद्ध कारवाया करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास

शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सातारा

जिल्हयातील अमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांचेवर

कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

दि.०३/०७/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, एक इसम पुनिकॉन मोटार सायकलवरुन मुंजवडी ता. फलटण जि.सातारा गावातील माध्यमिक शाळेजवळ अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना नमुद इसमास ताब्यात घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी सापळा लावून नमुद इसमास व खरेदी करण्याकरीता आलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्या इसमांच्या कब्जात एकूण ५ लाख रुपये किमतीचा २० किलो गांजा तसेच लाख रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल मिळून आल्याने त्यांचेविरुध्द फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गु.र.नं.३३५४/२०२३ गुंगीकारक औषधी इथेच मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ कलम (क), २० ()() (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा पांच मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, सावीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, अमित माने, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, स्वप्नील दौड, वैभव सावंत, संभाजी साळुंखे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट