महाडमध्ये बॅक ऑफ बडोदा बँकेत एका बुरखाधारी महिलेने केलेल्या दागिन्यांच्या चोरीची तक्रार दाखल…

0
Spread the love

प्रतिनिधी- रेश्मा माने

महाड:- महाड शहरातील बँक ऑफ बडोदा येथील कर्मचाऱ्यांच्या ड्राव्हर्समधून दोन लाख 87 हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याची घटना नुकतीच महाड प्रभात काॅलनी येथील शाखेत घडली आहे.

महाड शहर पोलिसांकडून सदर बुरखाधारी महिलेचा शोध सुरू असून भर दिवसा बँकेत घडलेल्या घटनेमुळे महाड शहरात मोठी खळबळ माजली आहे.

महाड शहरातील प्रभात कॉलनी भागामध्ये बँक ऑफ बडोदा बँकेची शाखा आहे. या शाखेतील कर्मचारी स्वरूप बालन वय 35 सध्या रा. महाड, मूळ रा. केरला या कर्मचाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सोमनाथ शर्मा व मानसी गोठल या ग्राहकांनी बँकेत ठेवण्यासाठी दोन लाख 87 हजार रुपयांचे दागिने दिले होते.

दुपारच्या सुमारास बुरखाधारी महिलेने या ड्रायव्हर्स मधील हे दागिने लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महाड शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात बुरखाधारी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री आर. बी. पवार हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट