औरंगाबाद येथील देवगाव पोलिसांनी थरारक पाठलाग करून गुन्हा आणला उघडकीस …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

औरंगाबाद:– सपोनि अमोल एस. मोरे व चालक पोना / १४६७ तडवी असे पोलीस स्टेशन देवगाव रंगारी असे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना रात्री ९:३० वाजेच्या सुमारास मोजे देवळाणा ता. कन्नड येथे एक पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप यावर अनोळखी दोन ते तीन इसमांनी फिर्यादी बाळू सर्जेराव सोनवणे यांची टाटा कंपनीची सुमो कार क्र एम एच २३- ए.डी १८०६ चोरुन पळवून नेली असल्याची माहिती मिळताच तात्काळ मा. पोलीस अधीक्षक साहेब, औरंगाबाद यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यात आली.

त्यानुसार सदर टाटा सुमो कार क्र एम एच २३- ए.डी १८०६ हीचा शोध घेत असतांना ते देवगाव कडे येत असतांना दिसली. त्यावेळी तिला अटकाव करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने हुलकावनी देवुन कसाबखेडा कडे पळवून नेली.

त्यावेळी जिल्ह्यातील श्री. दिनेश कोल्हे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग सिल्लोड यांनी पोलीस स्टेशन खुलताबाद, कन्नड शहर, कन्नड ग्रामीण यांना वायरलेस द्वारे माहीती देऊन सदर गाडीचा पाठलाग सुरू ठेवला असता सदर चोरांना पोलीस हे पाठलाग करीत असल्याचे समजल्याने व पकडल्या जाण्याची भितीने त्यांनी सदर वाहन हे धुळे सोलापुर हायवे रोडने वेरुळच्या ब्रिजच्या खालुन विरुद्ध दिशेने नेवुन कन्नड च्या दिशेने चालवुन साधारण २ ते ३ किलो मिटर पुढे गेल्यावर वाहन रोडच्या कडेला थांबवुन पटकन गाडीतून उड्या मारुन शेतात अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.

त्यावेळी सदर चोरट्यांच्या पाठीमागे पळत जावुन शोध घेतला परंतु ते अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. त्यावेळी दंगा काबू नियंत्रण पथक, श्वान पथक औरंगाबाद ग्रामीण यांना बोलावुन पुन्हा शोध घेतला परंतु सदर चोर हे मिळून आले नाही. सदर चोरीस गेलेली टाटा सुमो कार ही पोलीस स्टेशनला आणुन बघितली असता त्यात घरफोडी व चोरी करण्याचे हत्यारे मिळुन आलेले आहे.

सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे बाळु सर्जेराव सोनवणे वय ३४ वर्ष व्यवसाय मजुरी रा. देवळाणा ना कन्नड जि औरंगाबाद यांचे फिर्यादवरुन पो स्टे गुरनं ९७ / २०२३ कलम ३७९, ३४ भादवि प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली टाटा सुमो कार क्र एम एच – २३- ए. डी- १८०६ व बोलेरो जिप क्र एम एच -१९-बीयु-४३०४ ह्या दोन्ही वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
नमुद कामगिरी मा. श्री. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण, मा. श्री. सुनिल लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण, मा. श्री. प्रकाश बेले उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग गंगापुर, मा. श्री दिनेश कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब उपविभाग सिल्लोड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल एस. मोरे, पोहेकॉ / ७७६ दिनेश कोळी, पोना / १४६७ जमील तडवी यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट