मुंबईत व्हेल माश्याची उलटी विक्रीकरीता आलेल्या इसमाच्या पोलीसांनीआवळल्या मुसक्या

0
Spread the love

मुंबई: दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी गोरेगांव पुर्व, आरे काॅलनी , आरे मार्केट , यु. क्र. 5 येथे आरे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि उल्हास खोलम यांना त्यांच्या खास गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, एक इसम शासनाने बंदी घातलेला व्हेल माश्याची उलटी (Ambergris) ची विकीकरीता यु.क. ०५, आरे मार्केट, आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे येणार आहे. सदरची माहिती पोउनि खोलम यांनी मा. वपोनि देसाई यांना दिली असता, त्यांनी सदरची माहिती तात्काळ मा. वरिष्ठांना कळविली असता, मा. वरिष्ठांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.


त्याप्रमाणे वपोनि देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून, मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी यु.क. ०५, आरे मार्केट, आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे रवाना झाले.

सदर ठिकाणी पोलीस पथकाने साध्या वेषात सापळा लावला असता, एक इसम जांभळया (पर्पल) रंगाची टिफीन बॅग हातात घेवून फिरत असल्याचे दिसून आला. सदर इसमास हटकले असता, तो पळून जावू लागल्याने त्यास ताब्यात घेवून, पंचासमक्ष नाव व पत्ता विचारून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात खालीप्रमाणे मुददेमाल मिळून आला. हस्तगत मुद्देमालाचे वर्णन:व्हेल माश्याची उलटी (Ambergris) हा red brownish रंगाचा पदार्थ, वजन ०५ किलो ६५ ग्रॅम अमूल्य किंमतीचा.


वर नमूद पदार्थाबाबत अटक इसमास विचारणा केली असता, सदरचा पदार्थ व्हेल माश्याची उलटी (Ambergris) हा पदार्थ असून, त्याची अंदाजे किं. १५,००,६५,०००/-रू (पंधरा कोटी पासष्ट हजार रूपये फक्त) असे असल्याचे त्याने सांगितले,
सदरचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेवुन, सदर इसमास पोलीस ठाणेस आणून, त्याचेविरूध्द पोलीस उप निरीक्षक खोलम यांनी फिर्याद घेवून, वि.स्था गु.र.क. ६३/२१ कलम २(१६)(सी).९, ३९,४४,४८(अ),४९(ब),५७,५१ वन्यजीव (संरक्षण) अधिनियम-१९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अटक आरोपीचे नाव व पत्ता:एक इसम, वय ३६ वर्षे,

नमुद कारवाई श्री. प्रविण पडवळ, अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई, श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१२, मुंबई, श्री. संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, दिंडोशी विभाग, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि ज्योती देसाई, पोनि श्री. संजय परदेशी, पोउनि उल्हास खोलम, पो.ना. गौतम बडे, पो.शि. अंबादास भाबड, बिनल शिंगाणे, पंकज ढोक, नागराज गोडसे, भावेश जानराव, अक्षय काटे यांनी अथक परिश्रम घेवुन, उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट