सातपूर पोलीस ठाण्याच्या महीलेचा खुनाचा गुन्हा २४ तासात उघडकिस…

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक :- दि. २६/०६/२०२३ रोजी विधाते गल्ली सातपूर गाय, नाशिक येथे राहणारे शनिदयाल समजियामन बैगा व त्याची पत्नी अशोक्तीबाई संविदयाल बैगा असे मुलाबाळांसह राहत होते, फिर्यादी शनिदयाल रामजियामन बैगा है कामावर गेले असतांना व मुले वर खोलीत पिक्चर पाहत असतांना घरात कोणी नाही असे पाहून कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी कारणासाठी फिर्यादी यांची पत्नी अशोक्तीबाई शनिदयाल बैगा, वय- २९ वर्ष हिचा सुरीने गळा चिरुन गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले होते. यावरून सातपूर पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या तकारी वरून । गुरनं १८८/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाच्या घटनास्थळी मा. श्री. प्रशांत बच्छाव सो. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. चंद्रकांत खांडवी सो.. | पोलीस उप आयुक्त (परिमंडळ – २) व सहा. पोलीस आयुक्त (अंबड विभाग), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांनी भेट देवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले होते..
त्याअनुषंगाने सातपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक, गुन्हेशाखा युनिट १ व २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीतांचा शोध घेण्याकामी आजुबाजुच्या भागातील सर्व सिसिटीव्ही ची पाहणी करीत असता असे निष्पन्न झाले की, सदर घरामध्ये बाहेरून कोणीही व्यक्ती आत गेल्याचे दिसुन आले नाही. त्यामुळे त्या घरामधील वरच्या व खालच्या रूम मध्ये राहणारे व्यक्तींपैकी एकाने खुन केला असावा. या अनुषंगाने सदर रूम मधील एकूण ११ संशयीत | इसमांकडे श्री. शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, श्री. विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, श्री पंकज भालेराव वपोनि सातपूर व गुन्हेशाखा युनिट ०१ चे पोलीस अधिकारी, अंमलदार, सातपूर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी सातत्याने सखोल कौशल्य पुर्ण चौकशी करीत असतांना त्यांच्या पैकी एक इसम नामे जयकुमार परशुराम बैगा वय २६ वर्षे रा. गाव गिजीरी, ता. जि. उमरिया, राज्य मध्यप्रदेश, यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने मी व मयत आम्ही ऐकमेकांचे नातेवाईक असुन आमचेत मुळ गावाकडील शेत जमीनीच्या बांधावरून वाद असल्याचे सांगीतले. मयत महीला घरात एकटी असतांना तिला जमीनी बाबत विचारणा करता तिने वाद केल्याने घरातील चाकुने तीचे गळ्यावर वार करून तीस गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली आहे. यावरून खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याने सदर आरोपीतांस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सातपुर पोलीस स्टेशन करीत आहे.
मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री अंकुश शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील नागरीकांना अहवान केले होते की, “एक सी.सी.टी.व्ही कॅमेरा पोलीसांसाठी ” सदर आवाहनाला प्रतिसाद देवून सदर परीसरातील राहणारे श्री. राहुल जाधव यांनी लावलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेरामुळे सदर गुन्हा उघडकिस येण्यास खरी मदत झाली. तरी यापुढे नाशिककरांना सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव सो, मा. पोलीस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख अंबड विभाग, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. वसंत मोरे सो यांचे मार्गदर्शना खाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंकज भालेराव, सातपूर पो.स्टे. गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर चे वपोनि. श्री. विजय ढमाळ, तपासी अधिकारी सपोनि धिरज गवारे, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत गुन्हे शाखा, पोउपनि वाघ, व सातपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार व गुन्हे शाखा युनिट क. १ चे अंमलदार यांनी संयुक्तरित्या केलेली आहे. 1506
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com