सोलापूर पोलीस आयुक्त श्री. हरिष बैजल यांची खात्यांतर्गत मोठी कारवाई..

आरोपीच्या फायदासाठी ठेवलेल्या उणिवामुळे विजापूर नाका पोलीस ठाण्यातील सहा.पोलीस निरीक्षक श्री. शीतलकुमार कोल्हाळ यांना केल निलंबित..

सोलापूर :विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील विजापूर रोडवरील नागेश डान्सबारवर टाकलेल्या धाडीत पंचनामा करताना २० ते २५ आरोपींना फायदा व्हावा यासाठी उणिवा ठेवल्या. चौकशीनंतर कोणालाही न सांगता सिक रजेवर गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ ( डीबी पथकप्रमुख ) असे निलंबित करण्यात आलेल्या सपोनि याचे नाव आहे.
सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्री नागेश डान्सबारवर धाड टाकली होती. डान्सबारमधील गर्दी पाहून शीतलकुमार कोल्हाळ व इतर कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले होते. घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी सहायक पोलीस आयुक्त यांनी कोल्हाळ यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. घटनास्थळी जप्ती पंचनामा केला, मात्र त्यामध्ये २० ते २५ आरोपींना फायदा व्हावा, या उद्देशाने जाणीवपूर्वक उणिवा ठेवल्याचे निदर्शनास आले.
पंचनाम्याबाबत विचारणा केली असता कोल्हाळ यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पुन्हा विचारणा केली असता काही एक उत्तर न देता कोणाला काहीही न सांगता सिक रजेवर गेले. कोल्हाळ असते. या कसुरीमुळे त्याना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com