रायगड जिल्ह्यातील माणगांव वाहतूक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी…..

पेट्रोलिंग दरम्यान माणगांव रेल्वे स्टेशनं जवळ आढळून आलेल्या दोन अल्पवयीन मुलांना केले पालकांच्या ताब्यात…….
प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-माणगांव वाहतूक पोलीसाचे कौतुक करावे तितकेच कमी आज दि.३० जून रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास माणगांव रेल्वे स्टेशनं येथे पेट्रोलिंग करताना त्यांना दोन अल्पवयीन मुले कोणाच्या तरी शोधात दिसताना आढळून आले असता त्यांनी त्या दोघांची विचारपूस केली असता ते दोघेही हरवले आहे असे त्यांनी सांगितले तसेच आम्ही महाड तालुक्यातील वीर आदिवासीवाडी या गावातील असून आम्हाला घरी कसे जायचे हे समजत नाही असे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की कुमार रुपेश रमेश पवार वय वर्ष ९ आणि कुमार ऋतिक रमेश पवार वय वर्ष ७ या दोन्ही मुलांना माणगांव वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस शिपाई बापूसाहेब बाळासो शिंदे व शिवराज ज्ञानोबा बांडे यांनी हरवलेल्या अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट करून दोन्ही मुलांना त्याच्याकडे सुखरूप पोहचवले यावेळी त्या दोन्ही मुलाचे नातेवाईक मंगेश वसंत पवार यांनी माणगांव वाहतूक पोलिसाचे मनःपूर्वक आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com