येलावडे गावचे तरुण तडफदार युवा नेते मा. मंगेश सावंत यांचा ४४ वा वाढदिवस बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमात उत्साहात साजरा, वाढदिवसानिमित्त मा. मंगेश सावंत यांनी दिला सामाजिक कार्याचा आदर्श…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-माणगांव तालुक्यातील मौजे येलावडे गावचे सुपुत्र व ग्रुप ग्रामपंचायत भागाड चे माझी सद्यस्त तसेच येलावडे गावचे शिवसेना शिंदेगट युवा अध्यक्ष मंगेश सावंत यांचा ४४ वा वाढदिवस बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमात आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमातील वास्तव्यास राहणारे वृद्ध यांना आपलं बालपण आठवल तसेच आपलं मुलगा मुलगी कामानिमित्त बाहेर गावी तसेच कोणाला मुलबाळ नाही त्यांना मनभरून आनंद झाला की मंगेश सावंत सारखा मुलगा आपल्या जवळ येतो आणि आपल्यासोबत वाढदिवस साजरा करतोय यांचाच आम्हाला आनंद वाटतो.

मंगेश सावंत यांनी आजपर्यंत आपला वाढदिवस त्याच्या घरी किंवा कुठेतरी बाहेर केला होता पण त्यांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने माऊली वृद्धाश्रमात करावी जेणेकरून आपले आई वडील त्याच्यात दिसतील असं गृहीत धरले वृद्धाश्रमात वाढदिवसा निमित्त वृद्धजणांना जीवनपयोगी वस्तू देऊन मन मोकळ केल तसेच वाढदिवस साजरा करताना आपले आई वडील या जगात नाही म्हणून तुम्ही सर्वच माझे आई वडील आहात हे सांगण्यात आले. तसेच पूर्ण रायगड जिल्ह्यातून आलेल्या आपल्या मित्र – परिवार, सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी येलावडे गावी कुटुंबाच्या साथीने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी मंगेश सावंत यांनी गावातील भजन – कीर्तन मंडळीला पेटी वाद्याची भेट देऊन मदत केली.


मंगेश सावंत हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी आतापर्यंत गावाचा विविध स्तरावर विकास केला आहे. गार्डन, जिमखाना, विदयुत पोल, सी सी टीव्ही अशा अनेक कामाना त्यांनी प्राधान्य दिले त्याच प्रमाणे एकादा गरजू व्यक्ती त्याच्याकडे येत असेल त्यांना कामाला लावणे अशा अनेक प्रकारचे विकास कामे त्यांनी आजवर केली आहेत. त्यामुळेच विभागात ते कार्यसम्राट म्हणून ओळखले जातात. वयाच्या नवीन वर्षाला सुरुवात करत असताना सुद्धा मंगेश सावंत यांचे गावाच्या विकासासाठी अजून काय करता येईल, याकडे लागले आहे. तसेच उद्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भोजन, निवारा, आरोग्य यांसारख्या सोयी सुविधांची तयारी करण्यात ते स्वतः जातीने पंढरपूरला उपस्थित राहणार आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com