हाॅटेलमध्ये बेकायदेशीर पार्टी करणाऱ्यांवर सावंतवाडी/सिंधुदुर्ग पोलीसांची मोठी कारवाई….

0
Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी-किशोर लाड

सावंतवाडी: सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी आंबोलीत हॉटेलवर पोलिसांनी छापा मारून 34 जणांवर कारवाई केली

सिंधुदुर्ग पोलिस-ठाणे

आंबोली येथील असलेल्या घनदाट जंगलातील एका हॉटेलमध्ये सिंधुदुर्ग पोलिस व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकत पर्यटक व वेटर, हॉटेल मालकासह एकूण 34 जणांवर कारवाई केली.

सदर कारवाई बाबतची फिर्याद उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलीस श्री. जगदीश रघुनाथ दुधवडकर यांनी दिली आहे.

कोणताही परवाना नसताना मद्य पिणे, अश्लील हावभाव करीत नृत्य करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमान्वये सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी 7500 रु.च्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली.

सावंतवाडीतील आंबोली येथील थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलवर बेकायदेशीररीत्या पार्टी चालू असल्याची टीप अज्ञाताकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नितीन कटेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकत सापळा रचून कारवाई केली आणि न्यायालयात हजर केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

    सांनी या हॉटेलवर धाड टाकत सापळा रचून कारवाई केली आणि न्यायालयात हजर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट