किरकोळ वादातुन खुनाचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलीसांकडून १ तासात अटक…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

डोंबिवली :- मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत मोनार्च क्रिस्टल, टाटा पावर हाऊस, कल्याण-शिळ रोड, डोंबिवली पूर्व या ठिकाणी मयत इसम शैलेश अविनाश शिलवंत व आरोपी किरण प्रभाकर शिंदे यांचा किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्या वादातुन किरण प्रभाकर शिंदे याने त्याचेकडील चाकुने शैलेश याचे शरीरावर ठिकठिकाणी वार करुन त्यास गंभीर जखमी करून, तेथुन पळुन गेला. शैलेश यास दवाउपचारकामी हॉस्पीटलमध्ये नेले असता, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषीत केले आहे. त्याबाबत मानपाडा पोलीस ठाणेत गुरनं ४७३ / २०२३ भादविक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नमुद गुन्हयातील आरोपीत किरण प्रभाकर शिंदे हा गुन्हा केल्यानंतर तेथुन औरंगाबाद येथे पळुन जाण्याचा प्रयत्नात असताना मानपाडा पोलीस ठाणेचे पोलीसांनी त्यास लागलीच ताब्यात घेवुन, त्याचेकडे गुन्हयाचेबाबत चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. गुन्हयात आरोपी किरण प्रभाकर शिंदे, वय २५ वर्षे, रा. महात्मा गांधी नगर, टाटा पावर हाऊस, पिसवली, कल्रूाण पुर्व यास अटक करण्यात आलेली आहे. सदरचा आरोपीत हा मानपाडा पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी दुखापती करण्याचे ०२ गुन्हे व विनयभंगाचा ०१ गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपी हा गुन्हा करुन औरंगाबाद येथे पळुन जाण्याचे प्रयत्नात असताना त्यास योग्य ते शर्थीचे प्रयत्न करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदरचा गुन्हा आरोपीत याने का केला, गुन्हा करताना त्याचेसोबत त्याचे काही साथीदार होते काय? याचा तपास चालू आहे. गुन्हयाचा तपास पोनिरी. (प्रशासन) श्री. सुरेश मदने हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनिरी. सुरेश मदने, सपोनि / अविनाश वनवे सपोनिरी. सुनिल तारमळे, सपोनिरी. दत्तात्रय सानप सपोनिरी. ज्ञानोबा सुर्यवंशी, पोउनिरी. प्रदीप गायकवाड, पोहवा / राजकुमार खिलारे, पोहवा / सुनिल पवार, पोहवा / दिपक गडगे, पोना / शांताराम कसबे, पोना/यलप्पा पाटील, पोशि/ अशोक आहेर, पोशि/ विजय आव्हाड, पोशि/महेंद्र मंजा, पोशि/ १३२१ / मिनीनाथ बढे यांचे पथकाने केली आहे.

मानपाडा पोलीस ठाणे,
४७३ / २०२३ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३०२ प्रमाणे

श्री विकी अविनाश शिलवंत, वय ३२ वर्षे, व्यवसाय- खाजगी नोकरी, राहणार- महात्मा गांधीनगर, टाटा पावर हाऊस, शितल आईस्क्रिमचे पाठीमागे, पिसवली कल्याण

दिनांक २५/०६/ २०२३ रोजी रात्री १०.४५ वाजताचे सुमारास महात्मा गांधी नगर, टाटा पावर हाऊस पिसवली कल्याण पुर्व

दिनांक २६/०६/ २०२३ रोजी ०५:०५ वाजता

शैलेश अविनाश शिलवंत, उर्फ बाळा वय- ३२ वर्षे, राहणार- महात्मा गांधीनगर, टाटा पावर हाऊस, शितल आईस्क्रिमचे पाठीमागे, पिसवली कल्याण पुर्व

किरण प्रभाकर शिंदे वय २५ वर्षे, राहणार- महात्मा गांधीनगर, टाटा पावर हाऊस, पिसवली कल्याण पुर्व
आरोपीत यास ताब्यात घेण्यात आले आहे .

चाकुने भोकसुन जीवे ठार मारणे यासाठी

यातील फिर्यादी यांचे मयत भाऊ नामे बाळा उर्फ शैलेश अविनाश शिलवंत, वय- ३२ वर्षे, राहणार – महात्मा गांधीनगर, टाटा पावर हाऊस, शितल आईस्क्रिमचे पाठीमागे, पिसवली कल्याण पुर्व यास यातील आरोपीत नामे किरण प्रभाकर शिंदे याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने डोळयाचे भुवईवर, छातीवर, हातांवर, पोटावर, कमरेवर चाकूने भोकसुन गंभीर वार करून खुन केला म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला होता.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट