स्वराज्य फौंडेशनच्या वतीने उपवनसंरक्षक राहुल पाटील यांचा सत्कार

उपसंपादक – रणजित मस्के
पुणे:- शिराळा बिळाशी गावचे सुपुत्र व पुणे येथील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वराज्य फौंडेशन बिळाशी व कणदुर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निनाई कारखाने संचालक बाजीराव पाटील म्हणाले की, राहुल पाटील यांनी जिद्द आणि चिकाटीच्या
जोरदार स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून आय. एफ. एस. अधिकारी पदी निवड झाली. उपवनसंरक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी सवसामान्य नागरिकांची स्वतः लक्ष घालून कामे करीत आहेत. प्रशासन आणि नागरिक यांचा सन्मवय साधून अनेक विधायक कामे पूर्ण केली आहेत. पुणे येथे प्रशासनात आदर्शवतपणे काम करत असताना


आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करावे या हेतूने बिळाशी तसेच परिसरातील वाड्यां वस्त्यांवरील विकास करण्याच्या दृष्टीने ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या आदर्शवत कामाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. साहेबांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. यावेळी स्वराज्य फौंडेशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com