ढालकाठी येथे 8 वर्ष वास्तव्यास असलेली महिला पुणे जेजुरी येथून बेपत्ता…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:महाड तालुक्यातील खरवली- ढालकाठी येथे आठ वर्ष वास्तव्यास असलेली महिला पुणे जेजुरी येथून बेपत्ता झाली आहे. राजू उर्फ राजेश शहा व त्यांची पत्नी रेश्मा राजू शहा हे दाम्पत्य गेली आठ वर्षापासून कामानिमित्त महाड तालुक्यातील ढालकाठी येथे राहत होते. काम मिळत नसल्यामुळे हे दांपत्य पुणे जेजुरी येथे सहा महिन्यापूर्वी कामासाठी गेले होते.

रेश्मा राजेश शहा वय 36 वर्ष रा. वरेगाव तालुका माणगाव जिल्हा रायगड असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव व पत्ता असून पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथून मी हॉटेलला कामाला जाते असे सांगून घरातून निघून गेली ती आत्तापर्यंत घरी आली नाही यामुळे पती राजेश याने सर्व नातेवाईकांकडे रेश्मा हिचा तपास केला परंतु रेश्मा हिचा कुठेही तपास लागला नाही यामुळे राजेशने थेट पोलीस ठाणे गाठलं. जेजुरी पोलीस ठाणे येथे रेश्मा बेपत्ता झाल्याची तक्रार पती राजेश याने दिली आहे. तसेच सदरची महिला कोठे आढळली तर तात्काळ संपर्क साधावा असे आव्हान जेजुरी पोलिसांनी केले आहे. बेपत्ता झालेल्या महिलेने अंगात ड्रेस परिधान केला आहे तसेच उंची पाच फूट, रंग सावळा , केस काळे, शरीर सडपातळ,पायामध्ये सॅंडल व उजव्या मांडीला सर्पदंश झाल्याचे निशाण असे महिलेचे वर्णन पोलिसांनी नमूद केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com