कमी दरात सोने देतो असे सांगुन, साथीदारांसह पोलीस बतावणी करून २५ लाखांची फसवणुक करणा-या आरोपींना भुईंज पोलीसांनी गुन्हयात वापरलेली कार व १२ लाख ५० हजार रुपये रोखडसह ४ आरोपी ताब्यात

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-२० जुन २०२३ रोजी दुपारी १२.३० ते १३.३० वाजणेचे दरम्यान कोल्हापुर रोडवरील विष्णुआण्णा फळमार्केट, सांगली येथे फिर्यादी मयुर सुभाष जैन, वय ३९ वर्षे, व्यवसाय व्यापार रा. ३०१, सुमंगल अपार्टमेंट, मोतीबाग, शिवाजीनगर पुणे व त्यांचे मित्र असे आरोपीसोबत स्वस्तात सोन्याचा व्यवहार पुर्ण करणेसाठी आले असताना आरोपी व त्याचे साथीदारांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना सोन्यासारखे दिसणारे हातात मावेल एवढे धातुचे बिस्कीट दाखवुन त्यांचा विश्वास संपादन करून आरोपीने फिर्यादी यांना मुद्दामहून त्याचे दोन साथीदार पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी यांचेकडून रोख रक्कम २५ लाख रुपये साथीदारामार्फत घेवुन फिर्यादी यांना सोने न देता त्यांची फसवणुक करून २५ लाख रुपये रक्कम घेवून पसार झालेबाबत सांगली शहर पोलीस ठाणे गुरनं. ३५७/२०२३ भादवि कलम ४०६, ४२० १७०, १७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयातील फसवणुक झालेली रक्कम ही मोठी असल्याने तसेच आरोपी फसवणुकीची रक्कम घेवुन गुन्हयात वापरलेल्या गाडीसह पुण्याच्या दिशेने जात असलेबाबत माहिती श्री. समीर शेख, भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा यांना प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यांनी सदर माहिती भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांना दिली व आणेवाडी टोलनाका येथे नाकाबंदी करणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे सपोनि रमेश गर्ज यांनी तात्काळ भुईंज पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, नितीन जाधव, सुशांत घुमाळ, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलावडे, महिला पोलीस अंमलदार रुपाली शिंदे, प्रियंका देशमुख तसेच महामार्ग पोलीस पथक भुईंज कडील पोलीस अंमलदार नवनाथ पवळे व जटाप्पा लोणार यांचेसह आणेवाडी टोलनाका येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान १९.०० वाजणेचे सुमारास गुन्हयातील संशयीत वाहन जीप कंपास है सातारा बाजुकडुन पुणे बाजुकड़े येताना दिसले. पोलीस पथकाने सदरचे वाहन अत्यंत कौशल्याने आणेवाडी टोलनाका येथे ताब्यात घेतले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुन्हयातील मुख्य आरोपीसह इतर १ संशयीत पुरुष व २ महिला मिळुन आल्या. संशयीतांची व त्यांचे ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता गुन्हयातील मुख्य आरोपी प्रशांत भुजंगराव निंबाळकर, वय ४८ वर्षे, रा. नांदुरा,जि. बुलढाणा याचे ताब्यात फिर्यादीची फसवणुक करुन आणलेल्या रकमेपैकी १२ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम मिळुन आली. संशयीतांच्या ताब्यात मिळुन आलेले गुन्हयातील वाहन जीप कंपास कार क्रमांक एम एच १२ पी.झेड. ७९९२ तसेच गुन्हयातील जप्त मुददेमाल रोख रक्कम १२ लाख ५० हजार रुपये असा एकुण २७ लाख ५० हजार रुपयेचा मुददेमाल दोन पंचांसमक्ष जप्त करुन जप्त मुददेमालासह संशयीत आरोपी यांना पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हयातील आरोपी हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन संशयीत आरोपी प्रशांत

भुजंगराव निंबाळकर, वय ४८ वर्षे रा. नांदुरा, जि. बुलढाणा याचेवर २ गुन्हे प्रविण महादेव खिराडे, वय- ३७ वर्षे, रा. तायडे कॉलनी, खामगाव, जि. बुलढाणा याचेवर २ गुन्हे मानसी सुरेश शिंदे, वय ३० वर्षे, रा. सारोळा, ता. मुळशी, जि. पुणे सध्या रा. शिवसाईनगर, वाघजाई मंदीराजवळ, कोथरुड, पुणे हिचेवर फसवणुकीचे ४ गुन्हे दाखल आहेत.

श्री. समीर शेख, भापोसे पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब नालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, नितीन जाधव, सुशांत घुमाळ, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलावडे, सागर मोहिते, महिला पोलीस अंमलदार रुपाली शिंदे, प्रियंका देशमुख तसेच महामार्ग पोलीस पथक भुईज कडील पोलीस अंमलदार नवनाथ पवळे, जटाप्पा लोणार यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.

संशयीत आरोपींची नावे –

१. प्रशांत भुजंगराव निंबाळकर, वय ४८ वर्षे, रा. नांदुरा, जि. बुलढाणा

२. प्रविण महादेव खिराडे, वय ३७ वर्षे, रा. तायडे कॉलनी, खामगाव, जि. बुलढाणा

३. मानसी सुरेश शिंदे, वय ३० वर्षे, रा. सारोळा, ता. मुळशी, जि. पुणे सध्या रा. शिवसाईनगर, वाघजाई

मंदीराजवळ, कोथरुड, पुणे

४. नम्रता शरद शिंदे, वय २८ वर्षे, रा. सारोळा, ता. मुळशी, जि. पुणे सध्या रा. शिवसाईनगर, वाघजाई मंदीराजवळ, कोथरुड, पुणे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट